आव्हाना येथे कोरोना संरक्षण टीमला मास्क व सेनीटायझर वाटप

भोकरदन । वार्ताहर

तालुक्यातील आव्हाना येथे  कोरोना  संरक्षक टीमला  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  जिल्हाउपाध्यक्ष  प्रा डॉ.अंकुश पाटील जाधव  यांच्या हस्ते  मास्क  व  टायझर चे वाटप करण्यात आले तर भोकरदन व जाफराबाद तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विस हजार मास्क व सेनिटाइजर वाटप करणार असल्याचे प्रा जाधव यांनी सांगितले.

दरम्यान या विषयी अधिक माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील आव्हाना आव्हाना येथील तरुणांनी  कोरोना टीम तयार केली असून या टीम च्या माध्यमातून  दिवस-रात्र  गावास पहारा देण्याचे काम हे तरुण करत असून  कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये मोलाची भूमिका  बजावत आहेत  या तरुणांच्या  संरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आव्हाना येथे  सेनीटायझर  व मास्क  चे वाटप करण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तथा पालकमंत्री राजेश भैय्या टोपे व माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या वतीने भोकरदन तालुक्यात व ाफराबाद तालुक्यात अंगणवाडी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सहाय्यक, आशासेविका, ग्रामपंचायत शिपाई व गावांमधील जे तरुण कोरणा संरक्षक म्हणून भूमिका बजावत आहे अशा तरुणांना  20000 मास्क व सेनीटायझर वाटप करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अंकुश पाटील जाधव यांनी सांगितले यावेळी माजी उपसरपंच अरुण पा. गावंडे, दामोधर पा. ठाले,योगेश्वर गावंडे,अबरार कैसर शेख, विनोद साळवे, मुक्तार बागवान, अशोक पांढरे,किरण गावंडे, सागर सोनवणे, बन्सीलाल पांढरे,अमोल गावंडे, दिलीप गावंडे, अजय राजपूत, कृष्णा गावंडे,अक्षय गावंडे, विशाल साळवे,गणेश जाधव, श्रीराम ठाले, सुनील तायडे, अजिनाथ सरोदे, गणेश पांढरे, कृष्णा सोनवणे,अनिल तायडे, गजानन गुंजाळ,लक्ष्मण फलके,विशाल गावंडे,मुबारक शहा, गजानन पांढरे यांच्या सह अनेक कोरोना रक्षक उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.