मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती विनायकराव मेटे केलं स्पष्ट

बीड

 

शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेच्या मैदानातून शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती विनायकराव मेटे स्पष्ट केलं आहे. त्या बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

ज्योती मेटे म्हणाल्या की, मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती. त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केला, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे ज्योती मेटे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक लढवावी असा जनतेचाच होरा होता. त्यामुळे मी त्या दृष्टीने चाचपणी केली तसेच उमेदवारी देखील मागितली होती. परंतु आता मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्योती मेटे यांनी सक्रिय होत लोकसभा लढवावी अशी शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी ज्योती मेटे यांना मागणी केली. यात अनेक बैठका झाल्या, अखेर ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं. मात्र कोणाकडून लढवणार हा प्रश्न होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीगाठीनंतर ज्योती मेटे या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार अशी चर्चा जिल्हाभर सुरु झाली. यात ज्योती मेटे देखील शरद पवार गटातून लढण्यास इच्छुक होत्या. मात्र यामध्ये ज्योती मेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर काही दिवसातच शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली.
 

गेल्या काही दिवसांपासून ज्योती मेटे या अपक्ष उभ्या राहतील, अशी चर्चा सुरू झाली. यामध्ये अनेकांचा सूर असा होता की ज्योती मेटे या निवडणुकीमध्ये निवडून येतील. मात्र शिवसंग्राम पक्षाचे कोणतेही ठरत नसल्याने बीड जिल्ह्यात संभ्रमावस्था होती. यात स्पष्टपणे शिवसंग्रामची कोणतीही भूमिका कोणत्याही पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळाली नाही. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून मी माघार घेत आहे, असं जरी स्पष्ट केलं असलं तरी नेमकं या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्रामचा नेमका कोणाला पाठिंबा असणार हे त्यांनी अस्पष्ट ठेवलं आहे. पक्ष आणि पक्षश्रेष्ठी एकत्रित येऊन निर्णय घेऊ आणि त्यानंतर आमचा निर्णय स्पष्ट करू, असं मेटे यांनी सांगितलं. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली हे आता त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आहे.

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.