राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होईल. अर्ज भरण्यासाठी १० ते १७ नोव्हेंबर ही मुदत असेल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती निवडणुकीच्या मतदानासाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

नामनिर्देशन – 10 नोव्हेंबर

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत- 17 नोव्हेंबर

अर्जाची छाननी – 18 नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची तारीख- 21 नोव्हेंबर

उमेदवारांची अंतिम यादी- 26 नोव्हेंबर

मतदान दिनांक – 2 डिसेंबर

मतमोजणी – 3 डिसेंबर

 

 

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?

राज्याच्या राजकारणात मराठवाड्याचं मोठं योगदान असून मराठवाड्यातील (Marathwada) नेतेमंडळी मराठवाड्याच्या विकासासाठी नेहमी आग्रही असते. त्यामुळेच, मुख्यमंत्री कोणीही असो, मराठवाड्याच्या विकासासाकडे, आमदार, खासदारांकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे (Election) सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. लोकसभा निवडणुकीत 8 खासदार आणि विधानसभेला 48 आमदार सभागृहात पाठवणाऱ्या मराठवाड्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. येथे 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांचाही बिगुल वाजणार आहे. 

मराठवाडा विभागातील संपूर्ण आठ जिल्ह्यात मिळून 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती नगरपरिषद आणि किती नगरपंचायतसाठी निवडणूक होत आहे, यासंदर्भाती माहिती खाली देण्यात आली आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात एकूण 48 नगरपालिका आणि 11 नगरपंचायत आहेत. तर, संभाजीनगर, लातूर या दोन महापालिकांसाठी निवडणुका होणार आहे. त्यात, सर्वप्रथम नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर आता वेळेचे बंधन आले असून, निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आज सर्वाधिक मानली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद : 05 

गंगापूर नगरपरिषद 
कन्नड नगरपरिषद 
खुल्ताबाद नगरपरिषद 
पैठण नगरपरिषद 
वैजापूर नगरपरिषद

छत्रपती संभाजीनगरजिल्ह्यातील नगरपंचायत : 01

फुलंब्री नगरपंचायत 

बीड जिल्ह्यातील नगरपरिषद 06

बीड नगरपरिषद 
गेवराई नगरपरिषद
धारूर नगरपरिषद
परळी-वैजनाथ नगरपरिषद
माजलगाव नगरपरिषद 
अंबाजोगाई नगरपरिषद 

जालना जिल्ह्यातील नगरपरिषद 03

अंबड नगरपरिषद
भोकरदन नगरपरिषद
परतूर नगरपरिषद

परभणीजिल्ह्यातील नगरपरिषद 07

गंगाखेड नगरपरिषद
जिंतूर नगरपरिषद
मानवत नगरपरिषद
पाथरी नगरपरिषद
पूर्णा नगरपरिषद
सेलू नगरपरिषद 
सोनपेठ नगरपरिषद

हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषद 03

हिंगोली नगरपरिषद 
कळमनुरी नगरपरिषद
वसमत नगरपरिषद

लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद 04

अहमदपूर नगरपरिषद 
औसा नगरपरिषद 
निलंगा नगरपरिषद नगरपरिषद 
उदगीर नगरपरिषद नगरपरिषद  

लातूरजिल्ह्यातील नगरपंचायत 05

चाकूर नगरपंचायत नगरपंचायत 
देओणी नगरपंचायत नगरपंचायत 
जळकोट नगरपंचायत नगरपंचायत 
रेणापूर नगरपंचायत नगरपंचायत  
शिरुर अनंतपाल नगरपंचायत 

धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद 08

धाराशिव  नगरपरिषद  
तुळजापूर नगरपरिषद  
उमरगा नगरपरिषद  
मुरूम नगरपरिषद   
कळंब नगरपरिषद   
भुम नगरपरिषद   
परंडा नगरपरिषद
नळदुर्ग नगरपरिषद

नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद 12 

किनवट नगरपरिषद
भोकर नगरपरिषद
हदगाव नगरपरिषद
उमरी नगरपरिषद
धर्माबाद नगरपरिषद
बिलोली नगरपरिषद
मुखेड नगरपरिषद
देगलूर नगरपरिषद
लोहा नगरपरिषद
कंधार नगरपरिषद
मुदखेड नगरपरिषद
कुंडलवाडी नगरपरिषद

नांदेडजिल्ह्यातील नगरपंचायत : 01

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.