डॉक्टर अशोक थोरात आता राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक
बीड | वार्ताहर
बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक असताना राज्य शासनाने निलंबित केलेले डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन अखेर शासनाने रद्द केले आहे. मात्र त्यांना बीडलाच पुनर्नियुक्ती न देता त्यांना राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक म्हणून प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. आपले निलंबन रद्द व्हावे यासाठी डॉ. अशोक थोरात यांनी न्यायालयीन लढाई सुरु केल्यानंतर शासनाने ही भूमिका घेतली आहे.
बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉ. अशोक थोरात यांची कारकीर्द चांगली राहिली होती. मात्र कोरोना काळातील काही गोष्टींचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात ११ अधिकाऱ्यांची नावे असताना केवळ डॉ. अशोक थोरात यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. शासनाच्या निलंबन आदेशाला डॉ. अशोक थोरात यांनी मॅट आणि उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर उच्च न्यायालयाने मॅट ला कालबद्ध सुनावणीच्या निर्देश दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉ. अशोक थोरात यांच्या निलंबनाचे आदेश रद्द केले असून त्यांना प्रतिनियुक्तीवर राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक म्हणून नियुक्ती दिली आहे.
Leave a comment