भोकरदन |वार्ताहर
विहिरीचे बिल काढण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी दोन जणाला लाचलुपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना आज भोकरदन येथे घडली आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की यातील तक्रारदार हे दावतपुर ग्राम पंचायत सदस्य आहे. सदर सार्वजनिक विहीर सन 2021 मंजूर झालेली होती.सदर मंजूर विहीर खोदकाम चे अकुशल मजूर यांचे थकित मस्टर काढण्यासाठी आरोपी प्रशांत रामेश्वर दहातोंडे तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी) पंचायत समिती भोकरदन यांनी पंचा समक्ष 7000 रू.लाचेची मागणी केली. तसेच सतीश रामचंद्र बुरंगे संगणक परिचालक (कंत्राटी )पंचायत समिती भोकरदन यांनी पंचा समक्ष 3000 रू. लाचेची मागणी करून पंचायत समिती कार्यालय ,भोकरदन येथे स्वतः स्वीकारले.तर यातील आलोसे क्र. 2 याने लाचेची रक्कम घेतली नाही.
आलोसे क्र.1 यास पंचा समक्ष स्वतः 7000 रू. स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.तर आलो से क्रं.2 याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेऊन भोकरदन पोलीस स्टेशन,जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सापळा अधिकारी व तपास अधिकारी किरण बिडवे पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि.जालना. सापळा पथक -पोलीस अंमलदार -
शिवाजी जमधडे,जावेद शेख,कृष्णा देठे, चालक प्रविण खंदारे ला.प्र.वि.जालना पर्यवेक्षण अधिकारी,किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक यांनी कार्यवाही केली
Leave a comment