माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नाला यश
मतदार संघातील 46 गावांचा समावेश
जालना | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा गावांचा विकास करण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नांमधून परतूर मंठा जालना ग्रामीण मधील नेर शेवली भागातील 46 गावांसाठी 05 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की दलित वस्त्यांचा विकास व्हावा यासाठी आपण नियमित प्रयत्नशील राहिलो असून, मागील सहा महिन्यापूर्वी परतूर मंठा विधानसभा मतदारसंघांमध्ये दलित वस्त्यांसाठी 50 सभामंडपांसाठी निधी आपण खेचून आणला होता त्याच पार्श्वभूमीवर मतदार संघातील दलित वस्त्यांसाठी हा 05 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
निधी मिळालेल्या गावांची नावे
परतुर तालुक्यातील आष्टी तालुका परतूर येथे सभा मंडप बांधकाम करणे 20 लक्ष खांडवी येथे सभा मंडप बांधकाम करणे 10 लक्ष, खांडवी वाडी समाज मंदिर 10 लक्ष वलखेड समाज मंदिर 10 लक्ष , दैठणा बुद्रुक सभा मंडप 10 लक्ष माव सभा मंडप 10 लक्ष, शेलगाव सभा मंडप 10 लक्ष , राणी वाहेगाव सभा मंडप 10 लक्ष, लिंगसा सभा मंडप 10 लक्ष, शिरसगाव सभा मंडप 10 लक्ष सातोना खुर्द सभा मंडप 10 लक्ष, कारळा सभा मंडप 10 लक्ष वैजोडा सभा मंडप 10 लक्ष, लोणी येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे 20 लक्ष पांडे पोखरी सिमेंट रस्ता 10लक्ष , आंबा सिमेंट रस्ता 10 लक्ष , शेवगा सिमेंट रस्ता 10 लक्ष, बाबुल तारा सिमेंट रस्ता 10 लक्ष, दैठना खुर्द सिमेंट रस्ता 10 लक्ष, खडकी सिमेंट रस्ता 10 लक्ष, नांद्रा सिमेंट रस्ता 10 लक्ष गोळेगाव सिमेंट रस्ता 10 लक्ष शिंगोना सिमेंट रस्ता 10 लक्ष
तर मंठा तालुक्यातील मंठा शहरांमध्ये सभामंडप 20 लक्ष, शिवनगिरी सभा मंडप 10 लक्ष, पाटोदा सिमेंट रस्ता 10 लक्ष विडोळी सिमेंट रस्ता 10 लक्ष गेवराई सिमेंट रस्ता 10लक्ष हेलस सिमेंट रस्ता 20 लक्ष, उमरखेडा सिमेंट रस्ता 10लक्ष कीर्तापूर सिमेंट रस्ता 10 लक्ष देवठाणा सिमेंट रस्ता 10 लक्ष, तळणी सिमेंट रस्ता 10 लक्ष, पांगरी गोसावी सिमेंट रस्ता 10 लक्ष , वाई सिमेंट रस्ता 10 लक्ष देवगाव खवणे सिमेंट रस्ता 10 लक्ष पांडुरना सिमेंट रस्ता 10 लक्ष सावरगाव सिमेंट रस्ता 10 लक्ष, भुवन सिमेंट रस्ता 10 लक्ष,
तर जालना तालुक्यातील नेर शेवली भागातील पिंपळवाडी येथे सभा मंडप 10 लक्ष रुपये, शेवली सभा मंडप 10लक्ष , कोळवाडी सभा मंडप 10लक्ष , ढगी सभा मंडप 10 लक्ष, सेवली सिमेंट रस्ता 10 लक्ष, कोळवाडी सिमेंट रस्ता 10 लक्ष बोरगाव सिमेंट रस्ता 10 लक्ष आदी 46 गावांमध्ये पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
Leave a comment