भोकरदन | प्रतिनिधी 

गारखेड्यात थोरात माय-लेकी चालवत असलेल्या गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे जालना जिल्ह्यातपर्यंत पसरले आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील रुग्णांसाठी भोकरदन हे केंद्रबिंदू होते. तेथील नामांकित हॉस्पिटलमध्ये हा गोरखधंदा जोरात सुरू असल्याची माहिती समोर आली असून पुंडलिकनगर पोलिसांचे एक पथक रविवारी (दि. १९) भोकरदनला दाखल झाले. ही माहिती समजताच तेथील दोन डॉक्टर व काही मेडिकलचालक पसार झाले आहेत. दोन्ही डॉक्टर पत्नीला नोटीस बजावून हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश यादव यांनी दिली. साक्षी सोमिनाथ थोरात (१९), सविता सोमिनाथ थोरात या मायलेकींसह डॉ. रोशन ढाकरे (रा. सिल्लोड), एजंट सतीश किसनराव टेहरे (रा. जयहिंदनगरी, पिसादेवी), सदाशिव अशोक काकडे (रा. खलुताबाद रोड, फुलंब्री), कृष्णा सुभाष नाटकर (रा. नक्षत्रवाडी), धर्मराज भाऊसाहेब नाटकर (रा. गोकुळ पार्क लोणीकंद, पुणे),
गोपाळ विश्वनाथ कळांत्रे (रा. जयभवानीनगर, ता. सिल्लोड), नारायण आण्णा पंडित (रा. मोढा खुर्द, ता. सिल्लोड), संदीप रमेश काळे (रा. ताजनापूर, बाजारसांवगी, ता. खुलताबाद), अशी अटकेतील दहा आरोपींची नावे आहेत. वाडी, हसनाबादमध्ये झाडाझडती पोलिस निरीक्षक राजेश यादव, अंमलदार सुनील म्हस्के, गणेश डोईफोडे, दीपक देशमुख यांच्यासह एक पथक रविवारी सकाळी भोकरदनला दाखल झाले. त्यांनी भोकरदन पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील वाडी, हसनाबाद आदी ठिकाणी सर्च ऑपरेशन राबविले. दरम्यान, भोकरदनमधील डॉक्टर  पसार झाल्याचे समजल्यावर पथकाने डॉक्टर पत्नीला नोटीस बजावून हजर राहण्याच्या सूचना केल्या. मेडिकलचालक तरुण पसार झाल्यावर त्याच्या एका नातेवाइकामार्फत शोधमोहीम राबविली.
अटकेतील आरोपी साक्षी आणि सविता थोरातने एजंट सतीश टेहरेचे नाव घेतल्यावर पोलिसांनी टेहरेला अटक केली.
टेहरेच्या चौकशीत सिल्लोडचा डॉ.
रोशन ढाकरेची लिंक उघड झाली. ढाकरे आणि त्याच्या दवाखान्यात काम करणाऱ्यांनी त्यांना गर्भपातासाठी औषधींचा पुरवठा करणाऱ्या भोकरदन येथील गुरू माऊली मेडिकलचे नाव उघड केले. त्यानंतर भोकरदनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे रॅकेट चालत असल्याचे पुंडलिकनगर पोलिसांच्या तपासात समोर आले. वाळूज गर्भपात प्रकरणात जेलमध्ये असलेला सतीश सोनवणेच या रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले. त्याच्यावर बीडमध्ये २, जालना आणि वाळूजमध्ये प्रत्येकी १, असे चार गुन्हे दाखल आहेत. त्यानेच साक्षीला गर्भलिंग निदान कसे करायचे, हे शिकवल्याची कबुली साक्षीने दिली आहे. तो तिचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते, मात्र अद्याप कोणतेही नाते उघड झालेले नाही.
दरम्यान, तिच्याकडून सोनवणेचा मोबाइल आणि टॅब जप्त केलेला आहे. टॅब आणि मोबाइलचे सील उघडण्यासाठीही पोलिसांनी न्यायालयाची परवानगी मागितली
आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.