चौसाळा । वार्ताहर
चौसाळ्यापासून दोन ते तीन कि.मी अंतरावर असलेल्या पिंपळगाव रस्त्यावर धावत्या स्कॉर्पिओ जीपने अचानक पेट घेतला.प्रचंड तापमानामुळे जीपमधील वायरिंग जळाल्याने आग वाढत गेली अन् क्षणार्धात संपूर्ण जीप आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.
ही घटना आज बुधवारी (दि.24)सायंकाळी घडली. सुदैवाने चालकासह जीपमधील 8 महिला तातडीने खाली उतरल्या. त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील लोक घटनास्थळी धावून गेले. मात्र आग प्रचंड असल्याने जीप जळाल्याने नुकसान झाले आहे. उष्मा प्रचंड वाढत असून बुधवारी अनेक ठिकाणी तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळेच ही घटना घडल्याची चर्चा होत होती.
Leave a comment