जालना- वार्ताहर
धन एका जन्मा पुरते असते तर पुण्य हे हे जन्म ना जन्म चालते धनाला मर्यादा असते तर पुण्य हे अमर्यादा असते, पैसा हे धन आहे तर पुण्य हे महाधन आहे असे प्रतिपादन शब्दप्रभू हभप उल्हास महाराज सूर्यवंशी आळंदी देवाची यांनी कीर्तनात बोलतांना केले ते बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव-सायगाव येथील श्रीक्षेत्र पावनधाम आश्रम येथे अखंड हरिनाम सप्ताहात बोलत होते.
पुढे बोलतांना महाराज म्हणाले की साधुसंत हे महात्मा आहेत, महात्माला कधीही मरण नसते ते अमर असतात तसे साधू पुरुषाला काळ पडद्याआड टाकू शकत नाही, महापुरुषाचे प्राण कधीच जात नाहीत ते चैतन्य रूपात असतात, काही संत हे देवरूपात विलीन होतात तर काही संत संजीवन समाधीत विलीन होतात माऊलींची संजीवन समाधी ही भक्तीचा भाव समाधी, योग्याची विकल्प समाधी आहे, जे गुण देवात आहेत तेच गुण साधू संतात आहेत, देवाकडे सहा गुण आहेत तर तेच सहा गुण ज्ञानेश्वर माऊली कडे ही आहेत, देवाकडे श्रेय आहे तसे संताकडे श्रेय आहे, देवही सुंदर आहेत तसे संतही सुंदर आहेत, एकाच्या पाया जवळ लक्ष्मी आहे तर एकाच्या दारात लक्ष्मी आहे, ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा ईश्वर आहे, ज्ञान आणि ईश्वर वेगळे नाहीत, देव अवतार घेतात भक्तासाठी तर संत येतात सर्वसामान्य लोकांसाठी देव व्यापक आहे तसे संतही व्यापक आहेत, देवाची साधना केली तर पुण्य मिळते तसे संतांची ही संतांच्याही संगतीत गेले तर पुण्य मिळते, प्रपंचात लाभ नाही फक्त आशा आहेत तर परमार्थात लाभ आहे, संतांच्या संगतीत आपला उद्धार होतो असे प्रतिपादन महाराजांनी बोलताना केले यावेळी पखवाज साथसंगत सर्वश्री हभप नरहरी महाराज निचळ, महादेव महाराज लकडे, गायनसाथ संगत निवृत्ती महाराज लकडे,किशोर महाराज दिवटे, दादासाहेब महाराज पाटील, तुळशीराम महाराज दाभाडे, रवींद्र महाराज मदने, विठ्ठल महाराज काळे गजानन महाराज मुळक यांनी केली
Leave a comment