बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सोमवारी 5 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल असून 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी बोर्डाच्या संकेतस्थळावर रिझल्ट पाहू शकणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडाळामार्फत बारावीचा निकाल सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहिर करण्यात येणार आहे. 

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. त्यानंतर विद्यार्थी या माहिती प्रिंटदेखील काढू शकतात. तसंच, डिजीलॉकर अॅपमध्ये डिजीटल रिझल्ट संग्रहीत करुन ठेवण्याची सोयदेखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 

 

या लिंकवर निकाल पाहू शकणार आहात

1. https://results.digilocker.gov.in 
2. https://mahahsscboard.in 
3. http://hscresult.mkcl.org 
4. https://results.targetpublications.org 
5. https://results.navneet.com 

कसा पाहाल निकाल?

- सगळ्यात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.
- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्याला क्लिक करा.
- क्लिक करताच नवीन विंडो ओपन होईल. त्याठिकाणी सीट नंबर आणि इतर माहिती भरुन ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

10 मे रोजी दहावीचा निकाल?

दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा दर वर्षीपेक्षा यंदा दहा दिवस लवकर सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेसोबतच निकाल देखील लवकर जाहीर केला जाणार आहे. त्यामुळं साधारणपणे एसएससी बोर्डाचा निकाल हा पुढच्या आठवड्यात सोमवार ते  शुक्रवार या कालावधीत कधीही लागू शकतो.  निकाल 15 मे च्या आतच लागणार, अशी माहिती एसएससी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.