बीड: बीडमधील एका शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनीसोबत लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली. येथील एका शैक्षणिक संकुलात अल्पवयीन विद्यार्थीनीला क्लासेसच्या केबीनमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात प्रा. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना शनिवारी मध्यरात्री अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणी आपल्यावर आरोप झाल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले की, प्रथम ही घटना दुर्दैवी आहे. याबाबत संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. संशयित माझ्या जवळचे असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. माझे कॉल तपासलेच पाहिजे, माझी त्यासाठी पूर्ण सहमती आहे. त्याचबरोबर सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आहेत, ते पोलिसांकडे आहेत. पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी दहा दिवस लागले नाहीत. मी जरी आमदार असलो आणि संशयित माझ्या जवळचे असले तरी, ज्या दिवशी तक्रार दाखल झाली, तेव्हाच गुन्हा दाखल झाला आहे.
संदीप क्षीरसागर म्हणाले की, त्यांची मागणी एसआयटीची आहे, त्याला मी सहमत आहे. जो प्रकार घडला तो चुकीचा घडला आहे. गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्या शिक्षकांना अटक झाली आहे. प्रशासनासोबत आम्ही चर्चा करतोय, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. ते माझ्या जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका, असं मी सांगितलं आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करायला 10 दिवस लागले नाही. माझ्या जवळचे असले तरी पीडिताने तक्रार देताच गुन्हा दाखल झाला आहे. मी काही त्यांच्यासारखं 150 दिवस पळून गेलो नाही. त्यांचे मंत्रीपद गेल्याने त्यांना दुःख आहे. ते या प्रकरणात बोलताय तसेच मस्साजोग प्रकरणी त्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत. त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे त्यांना दुःख
संदीप क्षीरसागर पुढे म्हणाले की, या प्रकरणात पोलीस देखील तत्परतेने कारवाई करत आहेत. मी आता बोलण्यापेक्षा सत्तेत मुंडे साहेब आहेत, त्यांनी जोर लावला पाहिजे. मस्साजोग प्रकरणी मुंडे बोलले की, 150 दिवस बाहेर राहावं लागलं, त्यांचे मंत्रीपद गेलंय, त्यामुळे त्यांना दुःख आहे. मात्र, लोकप्रतिनिधी रोज रस्त्यावर काम करतो. चहाच्या टपरीवर मी जातो, तिथे लोकं येतात, भेटतात. संबंधित लोक माझ्या ओळखीचे आहेत. पीडितेकडे मी जाणार होतो. मात्र, आताच जाणं योग्य नाही, त्यामुळे तिथे गेलो नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
Leave a comment