माजलगावचीं नाडी ओळखण्यात आ सोळंकेना अपयश
माजलगाव / उमेश जेथलिया
माजलगावचे आ प्रकाश सोळंके यांना पाच वेळा आमदार होऊनही 2001 चा भाजपा मध्ये असतानाच अपवाद वगळता 2006,2011,2016 व 2025 च्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही. नगराध्यक्षाची निवडणूक जनतेतून असो की नगरसेवकातुन आ सोळंके न प वर आपले वर्चस्व स्थापित करण्यात अपयशी ठरले आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जादूई फिगर गाठण्यात अपयशी ठरणार असल्याचे व आ सोळंकेचा डाव फसणार असल्याचे भाकीत दैनिक लोकप्रश्नने निकालाच्या 1 दिवस अगोदर व्यक्त केले होते. शिवाय 8-11 जागा जिंकणार असल्याचे भाकीत ही व्यक्त केले होते.ते खरे ठरले.

भाजपच्या स्थानिक व वरिष्ठ पातळीवरून युती न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हार न मानता आ सोळंकेनी पूर्ण ताकद लावत मेहरुणीसा खलील पटेल यांना उमेदवारी जाहीर केली. विरोधकांच्या तुलनेत पाच दिवस अगोदरच आ सोळंके यांनी उमेदवारी जाहीर केली. सहाल चाऊस यांच्या कुटुंबातून ओबीसी प्रमाणपत्र येणार नाही आले तरी आपण मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे मुस्लिम मतदार व आपले हक्काचे मतदार अशी जुळवाजूळव होऊन यंदा नगराध्यक्ष आपलाच असे गणित आ सोळंकेनी तयार केले होते. मात्र मुस्लिम मतदार ओढण्यात उमेदवार खलील पटेल यांना अपयश आले.मुस्लिम समाजात आजघडीला सहाल चाऊस यांच्या एवढा प्रभाव इतर कोणत्याही नेत्याचा नाही हे अधोरेखित आहे शिवाय माजलगावकरासाठी ही चाऊस म्हणजे कामाचा माणूस हे गणित पक्के आहे. तसेच भाजपा चा उमेदवार समोरून आल्यामुळे हिंदू मतदार राष्ट्रवादी सोबत येण्याची कसलीच शक्यता नव्हती. त्यामुळे आमदार असतानाही सलग चार पंचवार्षिक निवडणुकीत आलेले अपयश आ सोळंके साठी चिंतनीय आहे. नाही म्हणायला 10 नगरसेवक निवडून आणल्यामुळे आकडेवारी च्या गणितात ते नप तील सत्ताधारी पक्षाच्या बरोबरीने सत्तेत असले तरी नप ताब्यात नसल्याचीं सल त्यांना कायम राहील.
जनाधर संपूष्टात...?
राष्ट्रवादी शप सोबत असणारा दलित मुस्लिम जनाधार व भाजपा सोबत हिंदू जनाधार असल्यामुळे आ सोळंकेच्या राष्ट्रवादी अपला कोणताच मोठा जनाधर नसल्यामुळे प्रचारात राष्ट्रवादी अप उसन आवसान आणत असल्याचे स्पष्ट दिसत होते.
प्रशासकीय काळातील निष्काळजी पणा नडला
प्रशासकीय काळात तसेच 2017 च्या सहाल चाऊस यांच्यावरील अविश्वास ठरावांतर मुस्लिम समाजातील राग तसेच त्यानंतर आ सोळंकेच्या ताब्यात सुमारे 6 वर्ष नप होती. मात्र यां काळात सामान्य माणसाला कोणीच वाली नव्हता. कधी नव्हे ते बांधकाम परवानगी काढण्यासाठी पाच पाच लाख रु चीं लाच कर्मचारी व अधिकाऱ्यांनी खाल्ली यावर आ सोळंकेनी सपशेल दुर्लक्ष केले होते. शिवाय त्यांचेच नगरसेवक 10%- 17%चीं चर्चा खाजगीत करत होते याचा धुरळा ही प्रचारात उडाला होता.
ओबीसी मतांचा फटका
2024 च्या विधानसभा निवडणुकी नंतर आ सोळंकेनी आपला सर्वसमावेशक चेहरा 360 अंशत बदलत ओबीसी नेतृत्वा विरोधात केलेले वक्तव्य ओबीसी नसल्यामुळे मंत्री पद मिळत नसल्याचे वक्तव्य शहरातील 8000 ओबीसी मतदारांना दुखावणारे होते.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment