अशोक हिंगेंचाही गावागावात जावून प्रचार

बीड । वार्ताहर

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये मराठा समाज चांगलाच एकवटला असल्याचे चित्र सोशल मीडियावर रंगवले जात आहे. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती वेगळीच आहे.मूळातच आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जो गोंधळ झाला होता, तो प्रस्थापित विरुध्द विस्थापित या संतापातूनच झाला होता.दोन्ही पक्षाचे उमेदवार प्रस्थापित असल्याने ग्रामीण भागातील मराठा आंदोलन चळवळीतील कार्यकर्ते असलेले आणि वंचित बहूजन आघाडीकडून निवडणूक लढवणार्‍या अशोक हिंगे यांच्या पाठीशी समाज उभा राहत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असलेले बजरंग सोनवणे हे कारखानदार असून ते देखील प्रस्थापित आहेत. त्यामुळे गरिब मराठा उमेदवार असलेल्या अशोक हिंगे यांच्या मागे उभे राहण्याचे वातावरण ग्रामीण भागात असल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी तगडी फौज जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा, कॉर्नर बैठका, मेळावे, मतदारांशी संवाद असे कार्यक्रम राबवत आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे देखील जिल्ह्यातील गावा-गावात जावून मतदारांशी संपर्क करत आहेत. त्यांच्यासाठी बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर तर गेवराईत बदामराव पंडीत प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान जाती-पातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. मराठा विरुध्द ओबीसी अशी थेट विभागणी झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. सोशल मीडियावर तर मराठा एकीकरणाच्या पोस्ट जाणीवपूर्वक टाकल्या जात आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात हिरिरीने सहभाग घेणारे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम करणारे आणि वंचित कडून निवडणूक लढवणारे अशोक हिंगे हे या दोन तूल्यबळ उमेदवारांच्या तुलनेत साधारण उमेदवार ठरले आहेत. ते देखील आपल्या वाहनामधून वंचितचे कार्यकर्ते बरोबर घेवून गावा-गावात जावून मतदरारांशी संपर्क साधत आहेत. त्यांना गावा-गावामध्ये मोठी सहानभूती मिळत असल्याचे चित्र आहे.

जरांगेंच्या भूमिकेचा होणार फायदा

येरमाळा येथे यात्रेनिमित्त आल्यानंतर संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना, छत्रपती शाहू महाराज ही आदरणीय गादी आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार म्हणून अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांनाही मी मानतो, त्यांनाही सहकार्य करणे गरजेचे आहे अशी त्यांनी भूमिका मांडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात हिंगेंच्या पाठीशी उभा राहत असल्याचे चित्र आहे.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.