कुंभार पिंपळगाव / वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव येथे तिर्थक्षेत्र प्रसिद्ध भव्य असे हेमाडपंती उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे.या मंदिरासमोर उंच असा धर्म ध्वज आहे. वैकुंठवासी महंत१००८ धर्मवीर ब्रम्हलिन डॉ.कृष्णपुरीजी महाराज यांनी २०१८ मध्ये ७२ फुट उंचीचा अशा धर्म ध्वजाची उभारणी केली होती.
दिनांक 20 गुरुवार रोजी दुपारी १२ बारा वाजेच्या दरम्यान जोराचा पाऊस सुरू असताना अचानक विजाचा कडकडासह येथील धर्म ध्वजावर वीज पडली ध्वज व ध्वजाचा लाकडी उंच खांब जळून खाली पडला.राहिलेला खांब ही जळत होता.
आजूबाजूला गावातील वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी बसलेली होती. उतेश्वराच्या कृपा आर्शिवादाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. गावातील वयस्कर मंडळींनी असा विजेचा झालेला जोराचा कडकडाट पहिल्यांदाच ऐकला एवढा मोठा आवाज आमच्या कळण्यात कधी झाला नव्हता. असे त्यांनी सांगितले गावातील मंडळींनी मंदिराकडे धाव घेऊन पाहता ध्वज पूर्ण जळून खाक झाला व खांबही अर्धा जळाला. लाकडी खांब पावसात जळत असताना जमिनीवर खाली कोसळला . उन्हाळ्यात वीज पडण्याची अशी दुर्घटना मंदीर बांधल्या पासुन १०० वर्षाच्या काळात पहिल्यांदाच घडली.असल्याचं येथील वयोवृद्ध मंडळींनी म्हटले आहे.
Leave a comment