सुर्या लॉन्सवर कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन
बीड | वार्ताहर
माजी मंत्री प्रा.सुरेश नवले यांनी गेल्या तीन-चार दिवसांपूर्वीच शिंदे सेनेला रामराम ठोकला. आता प्रा.नवले कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असतानाच आज (दि.29) रोजी बीड शहरातील सुर्या लॉन्स येथे सायंकाळी 6.30 वाजता प्रा.सुरेश नवले मित्रमंडळातर्फे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली असून प्रा.नवले कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लागले आहे.
शिंदे सेना सोडल्यानंतर प्रा.सुरेश नवलेंची राजकीय भूमिका काय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आता राजकीय भूमिका घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नाही. या विषय राजकीय गोटातूनही तर्कवितर्क लढविले जात आहेत. नवले हे दोन वेळा विधानसभा सदस्य आणि एक वेळा विधानपरिषदेवरही राहिलेले आहेत. तसेच मंत्रीपदाचा प्रदिर्घ अनुभवही त्यांच्या पाठिशी आहे. सध्या देशात आणि राज्यात लोकसभेच्या निवडणूकीची धामधुम सुरू आहे. बीड मतदारसंघातही प्रचार आता अंतिम टप्प्याकडे सुरू झालेला आहे. उद्या उमेदवारांची अंतिम यादी लागणार आहे. अशा वेळी प्रा.सुरेश नवले यांची भूमिका महत्त्वाची आणि तितकीच निर्णायक ठरू शकते. त्यांच्यासमोर तीन पर्याय दिसतात एक तर महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि तीसरा पर्याय म्हणते तटस्थ राहणे. याच अनुषंगाने प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने उद्या बीड शहरातील सुर्या लॉन्स या ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी प्रा.नवले काय राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे
सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहन
शहरातील सुर्या लॉन्स या ठिकाणी प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आज (दि.29) रोजी सायंकाळी 6.30 वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास बीड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रा.सुरेश नवले यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेला रामराम ठोकत आपली नवी दिशा ठरविण्याचे संकेत दिले होते. आता पुढे काय ? असे प्रश्न कार्यकर्त्यांमधून विचारला जात असतानाच आज सोमवारी (दि.29) सायंकाळी 6.30 वाजता याच अनुषंगाने कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन सुर्या लॉनस या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेवून या विषयावर प्रदिर्घ चर्चा होणार आहे. त्यामुळे बीड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन सुधीर सुपेकर, श्रीमंत उबाळे, शिवाजी जाधव, शहादेव घोडके, नामदेव शेळके आणि बिभीषण चव्हाण यांनी केले आहे.
Leave a comment