मराठा तरुणांना ‘कॅमेरा बंद कर रे’, असे धमकावत सोनवणेंनी काढला पळ

परळी । वार्ताहर

 

एकीकडे भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलकांनी गावात अडवले असता त्यांनी त्या आंदोलकांशी संवाद साधत, त्यांचे संपूर्ण समाधान केले व शिवरायांच्या नावाच्या जयघोषात तिथून निरोप घेतला, ही घटना ताजी असतानाच आता अशाच एका प्रसंगाला आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे सामोरे जावे लागले आहे. मात्र बजरंग सोनवणे यांनी मराठा तरुणांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी ’कॅमेरा बंद कर रे’ असे धमकावत तिथून पळ काढल्याचे पाहायला मिळाले आहे!

 

झाले असे, की बजरंग सोनवणे हे परळी तालुक्यातील डिग्रस या गावात प्रचारासाठी जात असताना 4 ते 5 तरुणांनी त्यांची गाडी थांबवत त्यांच्याशी आरक्षणाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला बजरंग सोनवणे गाडीतून खाली उतरायला सुद्धा तयार नव्हते, असे व्हीडिओ मध्ये दिसत आहे. तरुण सोनवणे यांना गाडीतून उतरून चर्चा करण्यासाठी वारंवार विनंती करत होते, ’मला गावात जाऊ द्यायचे नाही का?’ असे उत्तर अत्यंत उद्धटपणे सोनवणे देताना व्हीडिओ मध्ये दिसतात.

 

 तरुणांनी खूपच आग्रह केल्यानंतर सोवणने गाडीतून खाली उतरले, तेव्हा बप्पा तुमची मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काय भूमिका आहे? पवार साहेबांची व तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? असा प्रश्न त्या तरुणांनी विचारला मात्र बजरंग सोवणने यांचा पारा चढला अन त्या तरुणांना उत्तर देण्याऐवजी, कॅमेरा बंद करा असे धमकावत, त्या तरुणांना दमदाटी करत सोनवणेंनी तिथून पळ काढला.विशेष म्हणजे चारच दिवसांपूर्वी असाच प्रसंग पंकजा मुंडे यांच्या सोबतही घडला होता. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे काही आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुंडे ताईंचा ताफा अडवला, मात्र त्याने विचलित न होता पंकजा मुंडे यांनी आंदोलकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सर्व प्रश्नांचे समाधान केले. विशेष म्हणजे गाडी अडवून विरोधात घोषणा देणार्‍या आंदोलकांनी पंकजाताई आगे बढोच्या घोषणा देत त्यांना निरोप दिला. त्यावेळी आंदोलकांची संख्या देखील शेकड्यात होती. मात्र समोर चार ते पाच तरुण असूनही ही किमया बजरंग सोनवणे यांना मात्र साधता आली नाही. उलट बजरंग सोवणने यांनी मराठा तरुणांना केलेल्या अरेरावी मुळे नाराजीचा सूर आहे.

बजरंग सोनवणे यांना केज तालुक्यातून आणखी एक धक्का

सरपंच, सदस्य,कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांना ऐन निवडणुकीत आणखी एक धक्का बसला असून, त्यांच्या ताब्यातील मुलेगाव ग्रामपंचायतचे सरपंच, अन्य सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना बजरंग सोनवणे यांच्या ताब्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या मुलेगाव ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्याने बजरंग सोनवणे यांना निश्चितच याचा फटका बसणार आहे. मुलेगावचे सरपंच बाळासाहेब लाड, सदस्य सुंदर लाड, बालासाहेब हारगावकर, अश्रुबाई जनार्दन लाड, मेघराज लाड, तुकाराम लाड, शरद हारगावकर, कळमअंबा ग्रामपंचायत सदस्य राजू हिरवे, अक्षय लाड, विनायक लाड, दशरथ लाड यांसह अनेकांनी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.