महिलेच्या संपर्कातील 41 पैकी 19 व्यक्ती विलगणीकरण कक्षात दाखल

उर्वरित व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल करण्याची कार्यवाही सुरु

जालना । वार्ताहर

परतुर तालुक्यातील मौजे शिरोडा येथील 39 वर्षीय महिलेच्या स्वॅबचा अहवाल दि. 21 एप्रिल, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला आहे. महिलेच्या सहवासात 49 व्यक्ती आल्या असुन यात 8 व्यक्ती हायरिस्क तर 41 लोरिस्क संपर्कातल्या असुन त्यापैकी 19 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असुन स्वॅब तपासणी व उर्वरित संपर्कातील व्यक्तींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु  असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. मौजे शिरोडा येथील महिलेस दि. 13 एप्रिल,2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे खोकला व ताप या आजाराचा उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. सदरील महिलेला 6 एप्रिलपासुन ताप व खोकला होता. 6 एप्रिल रोजी महिलेने परतुर व 10 ते 13 एप्रिल दरम्यान जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते.  जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल झाल्यास दि. 13 एप्रिल रोजी महिलेच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.  दि. 14 एप्रिल रोजी त्याचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला. महिलेचा दुसर्‍यांदा स्वॅबचा नमुना 20 एप्रिल रोजी पाठविण्यात आला होता.  त्याचा अहवाल दि.21 एप्रिल, 2020 रोजी रात्री 10.00 वाजता पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे. महिला ही न्युमोनिया आजाराने ग्रस्त असुन महिलेची प्रकृती स्थिर आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या पथकाने शिरोडा ता. परतूर येथे भेट देऊन तालुका आरोग्य अधिकारी, परतुर यांना कंटेन्टमेंट प्लॅनच्या अनुषंगाने सुचना देऊन महिलेच्या संपर्कात आलेल्या सहवासितांच्या पाठपुराव्यासाठी वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश असलेली दोन पथके तयार करण्यात आली असुन  80 कुटूंबातील 560 लोकांचे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. सामान्य रुग्णालय, जालना येथे दु:खी नगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असुन या महिलेचे तीन स्वॅबचे नमुने पॉझिटीव्ह प्राप्त झाले होते मात्र दि. 21 एप्रिल रोजी स्वॅबचा नमुना निगेटीव्ह आला असुन पाचवा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असुन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे. टाऊन हॉल परिसरातील एक 55 वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह आजारानेग्रस्त आहेत.  वाटुर ता. परतुर येथील 34 वर्षीय पुरुष, रोषनगाव ता. बदनापुर येथील 21 वर्षीय तरुण, लालबहादुरशास्त्री महाविद्यालय परिसर, परतुर येथील 75 वर्षीय पुरुष हे न्युमोनियानेग्रस्त असुन अंबड येथील 60 वर्षीय पुरुष रुग्ण क्षयरोगग्रस्त असुन जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल आहेत.  या सर्व रुग्णांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आलेले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 805 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 71 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 486 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 23 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 567 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने 01 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 532, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 94, एकुण प्रलंबित नमुने-27 तर एकुण 415 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 8, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 273 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 1, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -303, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-37, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 71, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 116 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 303 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना-48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-16, पोलीस प्रशिक्षण केंद्र-98, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 325 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 59 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 402 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडस प्रकल्प यांच्या नियोजनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन शहरातील गरजू व्यक्तींना आजपर्यंत 2 लाख 78 हजार 186 फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.