जालना । वार्ताहर

केंद्र सरकारकडून एकुण 11 भाषेत विकसित करण्यात आलेले ‘आरोग्य सेतू’ हे अ‍ॅप प्लेस्टोअर व अ‍ॅपस्टोअर वरून विनामूल्य डाऊनलोड करुन या अ‍ॅपचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करून आपल्या आरोग्य सुरक्षेविषयी माहिती वेळोवेळी जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी केले आहे.

भारत सरकारने कोरोना (कोव्हीड-19) या विषाणू प्रादुर्भावाची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी अँड्रॉइड व आयओएस प्रणाली धारक मोबाईल धारकांसाठी  ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप विकसीत केलेले आहे.  हे अ‍ॅप ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानावर आधारित असल्याने याद्वारे कोव्हीड-19 बाधित रुग्णांच्या मोबाईल क्रमांकाच्या संकलित माहितीच्या आधारे जी.पी.एस. तंत्रज्ञाद्वारे कोव्हीड बाधित रुग्ण  जवळपास आल्यास (साधारणतः सहा फुटाच्या अंतरावर) वापरकर्त्यास धोक्याची सूचना देते. तसेच कोविड-19 बाधेची स्व:चाचणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना, आपल्या नजीकचे कोव्हीड तपासणी केंद्र क्रमांक, कोव्हीड-19 बाधेच्या अनुषंगाने सर्व साधारण प्रश्नांची उत्तरे, राज्यातील विविध हेल्पलाईन क्रमांक तसेच अपरिहार्य स्थितीत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी ई - पासेस, सामाजिक अंतर बाळगणे व प्रतिबंधासाठी काय करावे व काय करू नये, आदी वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यात आली असुन आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल मधील ब्लूटूथ नेहमी सुरु ठेवणे आवश्यक आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.