औरंगाबाद । वार्ताहर

महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी व हिंगोली या आठ जिल्हयातील कृषीपंप वीज ग्राहकांच्या वीज जोडण्या,वीज वाहिण्या, ट्रान्सफार्मर, उपकेंद्र, वीज भार, अनधिकृत कृषी   वीज जोडण्यांची पाहणी महावितरणकडून करण्यात येणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री सुनील चव्हाण यांनी बिडकीन ता. जि.औरंगाबाद येथे कृषीपंप ग्राहकांची पाहणी करून शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

कृषी  वीज ग्राहकांना सुरळित, दर्जेदार व उच्चदाबाने वीज मिळावी.व नविन कृषी वीज जोडण्या देण्यासाठी महावितरण मुख्य कार्यालय मुंबई यांच्या सूचनेनुसार महावितरणतर्फे कृषीपंप वीज ग्राहकांची कर्मचा-यांकडून पाहणी करण्यात येणार आहे. यामध्ये कृषीपंप वीज ग्राहकांच्या अधिकृत, अनधिकृत  वीज जोडण्या, ट्रान्सफार्मर, उपकेंद्र, वीज भार,वीज वाहिण्या, अनधिकृत वीज जोडण्या इत्यादीची  माहिती महावितरण अघावत करीत आहे. व लॉकडावून नंतर जनमित्र व शाखा अभियंता प्रत्यक्ष पाहणी करून महावितरणच्या अ‍ॅपमध्ये माहिती संकलित करणार आहेत. याचाच एक भाग म्हणून नुकतेच बिडकीन, ता. जि. औरंगाबाद येथील कृषीपंप ग्राहक श्री कान्हू म्हसू ठान्हगे यांच्याशी महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती घेतली. शेतक-यांने कृषीपंप मोटारीला  कॅपॅसिटर लावल्यामुळे वीजभार कमी होतो. मोटरपंपांना योग्य दाबाने विघुत पुरवठा करण्यास मदत होते. मोटरपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. रोहित्रावरील वीजभार कमी झाल्याने रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होते. वितरण हानी कमी होते  आणि वीजबिल कमी होण्यास मदत मिळते. इत्यादी मौलिक सूचना त्यांनी याप्रसंगी दिल्या. तसेच बिडकीन येथील महावितरणच्या उपकेंद्रास भेट देवून पाहणी केली. यात उपकेंद्रातील रोहित्र व स्वीचयार्ड यांची देखभाल दुरूस्ती करण्याच्या सूचना  संबंधित शाखा अभियंता यांना दिल्या. या प्रत्यक्ष पाहणीमुळे कृषीपंप ग्राहकांना सुरळित वीज पुरवठा मिळण्यास मदत होणार असून नविन कृषी  वीज जोडण्या देण्यात येणार आहेत. याप्रसंगी औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री सुरेश गणेशकर, उपमहाव्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान श्रीमती कांचन राजवाडे, अभियंते यांची उपस्थिती होती.  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.