एकमेकांना शिवीगाळ देण्यात आल्याचा प्रकार
भोकरदन | प्रतिनिधी
आगामी मार्च महिन्यात होऊ घातलेल्या पाराशर शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी भोकरदन तालुक्यातील शिक्षकांनी रणसिंग फुंकले आहे. आपल्याच पॅनलचा कशाप्रकारे विजय होईल यासाठी ठिकठिकाणी बैठक आयोजित करून चर्चा व मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.अशातच शहरातील जाफराबाद रोडवरील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये वस्तीशाळा शिक्षकांची बैठक सोमवारी दि. 14 रोजी दुपारी 4 वाजेदरम्यान आयोजित करण्यात आली होती.बैठकीच्या मध्यांमध्ये चर्चा सुरू असताना चर्चेचे रुपांतर शिवीगाळ व त्यानंतर एकमेकांमध्ये झटापट झाली. दोन्ही शिक्षकांनी एकमेकांना हाग्याचोप दिल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली.शिक्षकांच्या शिव्यांचा आवाज एवढा जोरदार होता की शेतात काम करीत असलेले शेतकरी व रहिवाशांची शाळेच्या परिसरात तोबा गर्दी झाली होती. झटापट झाल्यानंतर काही शिक्षकांनी मध्यस्थीची भूमिका घेत वाद मिटविण्यासाठी एका शिक्षकाला शाळेच्या बाहेर काढून दिले.
शाळेच्या परिसरात कामगार व मोलमजुरी करणारा वर्ग राहतो. व त्यांची मुले याच शाळेमध्ये शिकतात. परंतु असा प्रकार घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार
शिक्षकांना गुरूचा दर्जा आहे परंतु शिक्षकांकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडत असेल तर तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार घडणार याची चिंता पालकांना सतावत आहे.
शेतकऱ्यांमधून क्रोध व्यक्त
वाद चालू असलेल्या शिक्षकांमधून
एवढ्या खालच्या दर्जाच्या शिव्या ऐकू येत असल्याने महिलांमधून क्रोध व्यक्त होत असून शेतकरीमहीला गटशिक्षण अधिकारी व पोलिसांना तक्रार देण्याच्या पवित्र्यात आहे.
Leave a comment