विहामांडव | वार्तहार
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील एका बावीस वर्षीय युवकांने स्वतःच्या शेतात जाऊन औषध प्रशासन करून आत्महत्या केल्याची घटना ता.४ रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली असून तुषार बंडू डुकरे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
विहामांडवा येथील तुषार बंडु डुकरे हा शुक्रवारी रोजी सकाळी आठ वाजता तो त्यांच्या विहामांडवा शिवारातील शेत गट नंबर 52 मध्ये उसाची लागवड करण्यासाठी गेले होते.
परंतु, सकाळी तुषारने सकाळी त्याच्या चुलत भाऊ प्रदीप डुकरे यास नऊ वाजता फोन करून सांगितले की,मी विषारी औषध पिलो आहे.
असे म्हणून त्याने फोन बंद केला.त्यानंतर प्रदीप याने गावातील व्यंकटेश यास फोन करून सांगितले की तुषार याने विषारी औषध पिला असुन त्याचेकडे लवकर जा असे सांगून सर्वांनी तुषार यास जाऊन पहिले असता तुषार हा विषारी औषध पिलेल्या स्थितीत जमिनीवर पडलेला होता. त्यावेळी तुषारला तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयत दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डाँ.शिवाजी पवार यांनी त्यास तपासून मृत घोषीत करून केले असून या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यांत करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी रामेश्वर तळपे हे करीत आहे.
Leave a comment