गेवराई तालुक्यातील सर्व सर्कल मध्ये भाजपचाच झेंडा फडकणार - बदामराव पंडित
बदामराव पंडित व बाळराजेंमुळे भाजपाच जिंकणार - शंकरराव देशमुख
गेवराई ---
गेवराई विधानसभा मतदारसंघातील जनता हुकुमशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात एकवटली असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यावेळी सर्व जागांवर भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त करून उमेदवारी मिळाली नाही तर विनाकारण केवळ उमेदवारीसाठी इकडे तिकडे जाऊन चूक करू नका असे आवाहन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले. तर यापुढे बीडच्या अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडितांना गुलाल लागणार नाही असे बाळराजे पवार म्हणाले. बदामराव पंडित आणि बाळराजे पवार या दोन शक्ती भक्तीच्या जोडीमुळे गेवराई तालुक्यातील सर्वच जागांवर भाजपचाच विजय होईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांनी व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती वेळी इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय जनता पार्टी कडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी गेवराई विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपाने ते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित भाजपा नेते बाळराजे पवार जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख पक्ष निरीक्षक संजय आंधळे, माधव निर्मळ सतीश मुंडे विधानसभा समन्वयक श्रीकांत सानप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की, गेल्या पंचवार्षिकला मी आणि लक्ष्मणराव पवार वेगवेगळे लढलो तरीही आमचेच सदस्य जास्त संख्येने निवडून आले. विरोधक असलेल्या अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजयसिंह पंडित आमदार झाल्यानंतर तालुक्यात कोठेही आनंद व्यक्त झाला नाही. लोकांनी गुलाल उधळला नाही. मात्र नगर पालिका आमच्या ताब्यात येताच गेवराई शहरासह तालुकाभरात नागरिकांनी आनंद व्यक्त केला. आता मी आणि बाळराजे पवार एकत्र असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सगळे सदस्य भाजपचेच निवडून येणार असा विश्वास व्यक्त करून, स्वयंघोषित गोदावरीचा वाघ गेवराईत न थांबता तिकडे बिंदुसऱ्याच्या काठावर फिरत आहे असा टोला बदामराव पंडित यांनी विजयसिंह पंडितांना लगावला.
बाळराजे पवार म्हणाले की, आता बदामराव आबा आणि मी एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे जात आहोत. मनामध्ये कोणतीही गटबाजी न ठेवता खुल्या दिल्याने कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. सामान्य कार्यकर्त्याला संधी आणि तालुक्याचा विकास साधायचा असेल तर यापुढे बीडच्या अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडितांना कधीही गुलाल लागणार नाही यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन केले. जशी नगर पालिका बहुमताने लोकांनी आपल्या ताब्यात दिली. त्याच पद्धतीने गेवराई पंचायत समितीवर आणि बीड जिल्हा परिषदेवर आजच भाजपचा झेंडा फडकला असा विश्वास व्यक्त करून बाळाचे पवार म्हणाले की जुने नवे करत बसू नका सगळे भाजपाचे या विचाराने पुढे चला असे आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख म्हणाले की माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आणि बाळराजे पवार हे शक्ती भक्तीप्रमाणे मोठ्या दिलाने एकत्र आल्यामुळे गेवराई तालुक्यात भाजपा मजबूत झाली आहे. येथे इच्छुकांची मोठी संख्या आहे मात्र जागा मर्यादित असल्याने निवडून येण्याचा निष्कर्ष ठेवून योग्य उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल. उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका असे आवाहन केले. बदामराव पंडित, बाळराजे पवार आणि शंकरराव देशमुख या तिघांनीही पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपचेच सदस्य निवडून द्या असे आवाहन केले.
याप्रसंगी संजय आंधळे, माधव निर्मळ नगरसेवक राजेंद्र राक्षसभुवनकर, प्रा पी टी चव्हाण, अंबादास पिसाळ, ॲड उद्धव रासकर, सुभाष शिंदे, शेख सिराज, आयुब पठाण यांनी समायोचित भाषणे केली. कार्यक्रमास माजी सभापती युधाजित पंडित, युवा नेते रोहित पंडित, युवानेते शिवराज पवार, युवानेते यशराज पंडित, माजी तालुकाप्रमुख प्रकाशराव सुरवसे, ॲड सुरेश हात्ते, गणेश लांडे, बाळासाहेब गायकवाड ज्ञानेश्वर खाडे, भाजपा गेवराई शहराध्यक्ष सचिन दाभाडे, गेवराई पूर्व अध्यक्ष राजेश पवार, गेवराई पश्चिम अध्यक्ष उद्धव रासकर आदींसह पदाधिकारी व इच्छुक उमेदवार हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिल्याने बैठकीला विराट सभेचे स्वरूप आले होते.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment