क्रांतीसुर्यमा जरांगे पाटील आपल्या सर्वांशी संवाद दौ-यावर येणार
कुंभार पिंपळगाव | वार्ताहर
सकल मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळवूनच देणार यासाठी स्वतः हाच आयुष्य पणाला लावणारा सामान्य कुटुंबातील क्रांतीसुर्य मा.श्री.मनोज दादा जरांगे पाटील दिनांक 30/09/2023 रोजी सकाळी १० वाजता आपल्या सर्वांशी संवाद साधण्या करीता कुं.पिंपळगाव येथे येत आहेत.
त्या निमित्ताने सकल मराठा समाज बांधवांनी दि.२८ सप्टेंबर गुरूवार रोजी येथील महारूद्र मंदिर सभागृहात १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकी दरम्यान पंचक्रोशीतील सकल मराठा समाज बांधवांच्या वतिने ठरवण्यात आले की सर्वांनी आपण आपल्या गावात मीटिंग घेऊन सर्व गावकऱ्यांना ता.२९ शुक्रवार रोजी दवंडी देऊन परवा ता.३० शनिवार रोजी कुंभार पिंपळगाव येथे होणाऱ्या संवाद दौ-यास मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करावे. व मराठा बांधवांना काही टीप्स द्याव्या
१)येताना सोबत स्वतःची छत्री ,पाणी बॉटल आणावी
२) माता भगिनी येणार असल्यामुळे शांततेत व शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे.
३) आपण अनलेली वाहाने कुठेही लाऊ नये ,वाहाने व्यवस्थित ठिकाणी लावावीत.समस्त मराठा बांधवांच्या वतिने गावा-गावात बैठक घेऊन सर्व गावकऱ्यांना कळवण्यात यावे.असे बैठकीत सांगण्यात आले.बैठकीस पंचक्रोशीतील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
Leave a comment