राहुल लोणीकर यांना कामाच्या मेरिट वर मिळाले प्रदेशाध्यक्ष पद - आमदार बबनराव लोणीकर
होतकरू व जनसेवा करणाऱ्या तरुणांना राजकारणात मोठी संधी राहुल लोणीकरांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं - माजी आमदार शकुंतला शर्मा यांनी दिल्या राहुल लोणीकर यांना शुभेच्छा
*पक्षश्रेष्ठी आणि ज्येष्ठांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - नवनिर्वाचित युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर*
*युवा मोर्चाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार - राहुल लोणीकर*
*युवा मोर्चाच्या वतीने राहुल लोणीकरांच्या स्वागतासाठी काढण्यात आली भव्य मोटरसायकल व फोर व्हीलर रॅली*
जालना | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकारणामध्ये तरुणांना मोठी संधी असून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेची शेतकरी कष्टकऱ्यांची सेवा करण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे असून बलशाली महाराष्ट्रासाठी सशक्त युवकांची मोठी फळी सकारात्मक विचाराने उभी राहणे आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले
भारतीय जनता युवा मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या सर्वपक्षीय नागरिक सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री लोणीकर बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या माजी आमदार शकुंतला ताई शर्मा ह्या होत्या तर मंचावर एडवोकेट ब्रह्मानंद चव्हाण पंडितराव भुतेकर दीपक भैय्या ठाकूर बाबासाहेब इंगळे जयमंगल जाधव सुभाष देविदास घनश्याम शेठ गोयल घुगे रमेश महाराज वाघ सुनील आर्दड डॉक्टर बळीराम बागल ओमप्रकाश चितळकर कमलताई तुले प्रल्हादराव बोराडे वीरेंद्र धोका यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की राज्याच्या राजकारणात तरुणांना खूप मोठी संधी असून त्या संधीचं सोनं करण्यासाठी कायम तत्पर आणि प्रयत्नशील असले पाहिजे राहुल लोणीकर यांनी युवा मोर्चा या युवकांच्या फळीमध्ये काम करत असताना जिल्हाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश महामंत्री अशा महत्त्वाच्या पदावर अत्यंत जबाबदारीने काम केलं असून खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन मोर्चे इत्यादींच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत त्यामुळे कोणत्याही शिफारशी शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल लोणीकर यांच्या कामाच्या मेरिटवर महाराष्ट्र राज्याच्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे काम करणाऱ्या माणसाला कोणत्याही शिफारशीची गरज नाही असेही यावेळी लोणीकर म्हणाले
राहुल लोणीकर यांच्या निवडीनंतर अनेकांनी राहुल लोणीकर प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा झाल्यानंतर घराणेशाहीचा आरोप केला होता त्यावर बोलताना वडील म्हणून मी कुठलीही शिफारस केली नाही पक्षश्रेष्ठींनी राहुल लोणीकर यांचे काम बघितलं आणि त्या कामाच्या मिरीट वरच ही निवड झाली आहे त्यामुळे ज्या लोकांनी घराणेशाहीचा आरोप केला आहे त्या लोकांनी स्वतःच्या पक्षात किती घराणेशाही आहे ते बघावं व सरपंच पदापासून ते पक्षाच्या सर्वोच्च पदापर्यंत एकाच आडनावाची लोक कशी आहेत त्यावर लक्ष द्यावं असे माजी मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता लोणीकरांनी टोला लगावला
नव्या पिढीच्या नव्या राजकारणामध्ये तरुणांना मोठी संधी असून राजकारणातून समाजकारणाकडे जाण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी गोरगरीब दिन दुबळ्यांच्या सेवेसाठी तरुणांनी राजकारणात येणे आवश्यक आहे राजकारणात स्वच्छपणे काम करत आपल्या नावाचा ठसा उमटवणे आवश्यक आहे राहुल लोणीकर यांना राज्य पातळीवर काम करण्याची मोठी संधी मिळाली असून त्यांनी या संधीचं सोनं करत महाराष्ट्रातील तरुणांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवावेत व राजकारणात स्वतःसह जालना जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिता येईल असे काम करावे अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्या माजी आमदार शकुंतला ताई शर्मा यांनी अध्यक्षीय समारोप करताना राहुल लोणीकर यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आपल्या खांद्यावर दिली असून वरिष्ठांच्या कुठलीही विश्वासाला आपण त्याला जाऊ देणार नाही अशा शब्दात राहुल लोणीकर यांनी आगामी काळात युवा मोर्चा सक्षमपणे युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभा राहील त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी युवा मोर्चा प्रयत्नशील राहील त्या माध्यमातून समाजाची जनतेची सर्वसामान्य व्यक्तीची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली असून त्या संधीचं आपण सर्वांच्या आशीर्वादाने निश्चित सोन करू अशा शब्दात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
मागील अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये युवा मोर्चा विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता त्यामुळे अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलन करून शासनाला सर्व करून सोडण्याचे काम युवा मोर्चा ने केला होता प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाण्याची तयारी युवा मोर्चाने ठेवली होती परंतु आता युवा मोर्चा सत्ताधारी पक्षात असून आता जबाबदारी आणखीन वाढली आहे अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा मोर्चाला मोठी फळी उभारावी लागणार आहे तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे त्यासाठी जीवाचे रान करून संपूर्ण महाराष्ट्रभर आपण फिरणार असल्याचे देखील यावेळी राहुल लोणीकर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले
*युवा मोर्चाच्या वतीने भव्य मोटरसायकल व फोर व्हीलर रॅली*
छत्रपती संभाजी महाराज चौक मोतीबाग येथून मोटरसायकल व फोर व्हीलर रॅलीला सुरुवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मामा चौक बस स्थानक मार्गे हॉटेल गॅलेक्सी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. परली दरम्यान शनी मंदिर येथे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे सुपुत्र युवा सेनेचे प्रदेशाचे नेते अभिमन्यू खोतकर यांनी राहुल लोणीकर यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या रॅलीसाठी प्रा.सुजित जोगस संदीप हिवराळे गोविंद ढेंबरे शिवराज नारीयवाले, गजानन उफाड विकास पालवे, सचिन गाढे, रमेश गायकवाड, राम राठोड, विक्रम ऊफाड, करण निकाळजे, सचिन नारियलवाले, विनोद दळवी, राहूल पळसपगार, अर्जुन गोरक्षक,जितु मुटकुळे, गणेश देशमुख, रवी दांडगे यांनी रॅलीसाठी प्रयत्न केले
यावेळी गणेशराव खवणे माऊली शेजुळ सतीशराव निर्वळ रमेश भापकर प्रकाश टकले संजय तौर संदीप भैया गोरे कैलासराव बोराडे शत्रुघ्न कणसे संपत टकले आळंदीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग वहिले अंकुशराव बोबडे विठ्ठलराव काळे जिजाबाई जाधव अश्विनी आंधळे डॉ सचदेव क्रांती खंबायतकर ममता सूर्यवंशी कैलास शेळके डॉ. रियाज शेख यांच्यासह सर्व पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व नगरपरिषदाचे व नगरपंचायतीचे नगरसेवक सरपंच चेअरमन कार्यकर्ते सत्कार समारंभ उपस्थित होते
Leave a comment