विहामांडवा | प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील नवगाव येथे उसाच्या शेतात  झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून सात जुगाऱ्यांना जेरबंद केले तर दोन जण पळून गेले. त्यांच्याकडून ११ हजार ९१० रुपये रोख, चार मोटारसायकली, सात मोबाईल असा एकूण २ लाख ४२ हजार ९३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या खबरीकडून माहीती आधारे पोलीस पथकाने रशीद दाऊदखान पठाण यांच्या उसाच्या शेतातील मनुका झाडाखाली असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगारांना ताब्यात घेऊन पोलीस अटक केली. तर दोघेही फरार झाले. योगायोगाने क्रिम साने 11 हजार, 910. रु. रोख रक्कम, विविध कंपन्यांच्या 4 मोटारसायकली व सात मोबाईल असा एकूण रु. 2 लाख 42 हजार, 939 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, आरोपीविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास बिट जमादार करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नेहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलिस निरीक्षक किशोर पवार, पुना. गोपाळ पाटील, पूना महेश माळी, पूना नुसरत शेख, पूना सचिन आगलावे,जानेवार यांनी कारवाई केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.