प्राध्यापकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच उमाकिरण शैक्षणिक संकुल सील!

 

प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात! फरार आरोपींचा शोध सुरू

 

बीड : शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन शिक्षकांनी केलेल्या गैर कृत्याच्या नंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रशासनाने शुक्रवारी (दि.२७) सकाळी उमाकिरण संकुलाला कुलूप ठोकले असून सर्व क्लासेसला सुट्टी देत या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करत घटनास्थळी पंचनामा केला.

 

उमाकिरण शैक्षणिक संकुलात फिजिक शिकवणारे प्राध्यापक प्रशांत खटावकर आणि प्राध्यापक विजय पवार या दोघांनी एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचे गेल्या एक वर्षापासून लैंगिक शोषण केले अशी फिर्याद या विद्यार्थिनीने दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसात या दोघांविरुद्ध गुरुवारी रात्री पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपी फरार आहेत. त्यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी पोलिसांनी ठाण्यात बोलावून घेतले आहे तर दुसरीकडे उमाकिरण शैक्षणिक संकुल सील करण्यात आले असून सर्व क्लासेसला सुट्टी देण्यात आली आहे.

उमाकिरण शैक्षणिक संकुलात बीड जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी  शिकवणी वर्गासाठी येतात. याच ठिकाणी असे घृणास्पद कृत्य उघडकीस आल्यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना उघड झाल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी देखील याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याचे दिसून आले.

याप्रकरणी पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एप्रील 2024 मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीट चे क्लासेस लावले होते. सकाळी 09.00 ते 12.00 पर्यंत अभ्यासीका लावली होती व तेथे मी नेहमी अभ्यास करण्याकरीता जात असायचे जुलै 2024 पासुन प्रशांत खाटोकर सर 12.00 वा.सु मी अभ्यासीकेमधुन बाहेर येण्याच्या टाईमला माझ्या अभ्यासीकेच्या खाली येवुन थांबायचे व मला म्हणायचे तु माझ्या सोबत चल गाडीवर बस तेव्हा मी त्याला नाही म्हणायचे. क्लासेस चा टाईम दुपारी 02.0 ते दुपारी 06.00 पर्यंत असायचा मी तेथे क्लास रेग्युलर करत होते. प्रशांत खाटोकर सर हे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानतर तेथील कॅबींन मध्ये एकटीला बोलवुन बॅड टच करायचे, अंगावरील कपडे काढायला लावुन माझे ते फोटो काढायचे.

कधी कधी ते क्लास संपल्यानंतर क्लास रूम मध्ये कोणी नसताना तीथे सुध्दा बॅड टच करायचे असे ते माझ्या सोबत वारंवार करत आसायचे. मला धमकी द्यायचे की, तु जर घरी कोणाला सांगीतले तर मी तुला मारुन टाकील. त्यांनतर मला प्रशांत खाटोकर सर यांचा बँड टच आवडत नसायचा म्हणून मी विजय पवार सर यांना सांगीतले तेव्हा ते मला म्हणाले की, त्यांना आम्हीच ठेवले मुलींना त्रास देण्यासाठी असे म्हणुन ते पण माझ्या सोबत वाईट वागायला लागले व ते मला कॅबीन मध्ये कोणी नसताना अंगाला बॅड टच करायचे ते मला सर्व मुले दुसऱ्या क्लासला गेले की, बाजुला बोलवायचे व एकटीला थांबुन ठेवायचे तेव्हा सर्व क्लास मधील मुले माझ्या कडे वाईट नजरेने बघायचे, जानेवारी 2025 मध्ये माझी 12 वी. ची बॅच चालु झाली. तेव्हा माझ्या क्लासचा टाईमींग सकाळी 07.00 ते 12.00 असा झाला होता तेव्हा सुध्दा ते माझ्या सोबत असेच वाईट वागायचे.

ते मला आवडत नसायचे मी ही झालेली घटना मझी मैत्रीण हिला सांगीतली होती तेव्हा ती मला म्हणाली की, ते आपले सर आहेत आपण त्यांचा रिस्पेक्ट करायचा, त्यामुळे मला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. हा झालेला प्रकार मी माझ्या आई- वडीलांना सांगितला त्यांतर माझे आई- वडील मला तक्रार देण्याकरीता पोलीस स्टेशनला घेवुन आले. तरी जुलै 2024 पासून ते 25 मे 2025 पर्यंत मला प्रशांत खाटोकर सर क्लास संपल्यानंतर वारंवार तेथील कॅबीन मध्ये एकटीला बोलवून अंगाला बॅड टच करायचे अंगावरील कपडे काढायला लावुन माझे ते फोटो काढायचे. ही गोष्ट मी विजय पवार सर यांना सांगीतल्या नंतर त्यानी सुध्दा माझ्या सोबत वाईट वागुन बेंड टच करायचे, असे पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

प्राध्यापकांनी केला विनयभंग

: या प्रकारामुळं बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रा. विजय पवार व प्रा. प्रशांत खाटोकर असे गुन्हा नोंद झालेल्या दोघांची नावं आहेत. 17 वर्षीय पीडिता ही बीड येथील एका नामांकित खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येत होती. ती 12 बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. जुलै 2024 मध्ये क्लासमधील शिक्षक प्रशांत खाटोकर यांनी तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कक्षात बोलावून घेत तिच्याशी अश्लील चाळे केले. विद्यार्थिनीनं ही बाब क्लासचे संचालक प्रा. विजय पवार यांना सांगितली व त्यांच्याकडं मदत मागितली. मात्र, विजय पवार यांनी खाटोकर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी स्वतः या विद्यार्थिनीशी आपल्या कक्षात अश्लील चाळे केले, असं तक्रारीत नमूद आहे.

कपडे काढायला सांगायचे : 

क्लास संपल्यानंतर प्राध्यापक कॅबिनमध्ये बोलावून घेत होते. त्यानंतर चुंबन घेत व छातीवरुन हात फिरवत असे. तसंच ते कपडे देखील काढायला सांगत होते, असा सर्व भयावह प्रसंग पीडित मुलीनं पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. पीडितेनं अशाप्रकारचे अनेक भयावह प्रसंग तक्रारीत नमूद केले आहेत. या तक्रारीवरुन बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दोन्ही आरोपी फरार :

 मे 2025 पर्यंत हा प्रकार सुरु होता. गुरूवारी पीडितेनं दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन गुन्हा नोंद करण्यात आलाय. या प्रकारामुळं बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.