बोरगाव बाजार । वार्ताहर
बोरगाव बाजार व परिसरातील सर्व सार्वजनिक वाचनालयाला लागली उतरती कळा,वाचनालय असे वर्षानुवर्ष असे बंदच आहे. राज्य शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये वाचन संस्क्रती निर्माण व्हावी,व त्यांना जगाच्या घडामोडीची,सामान्य न्यानाची माहीती व्हावी यासाठी शासनाने लाखो रुपयाचे अनुदान देऊन ग्रामिण भागात सार्वजनिक वाचनालयाची योजना सर्व महाराष्ट्रभर राबविली आहे,परंतु या योजनेत सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बुद्रूक,बोरगाव सारवाणी,बोरगाव बाजार,खातखेडा,कोटनांद्रा, तळणी,कासोद,देऊळगाव बाजार,म्हसला,सोनाप्पावाडीसह परिसरातील सार्वजनिक वाचनालय हे नावापुरते राहीले आहे.
या वाचनालयामध्ये ना दैनिक,ना कादबंरी,ना साप्ताहीक,माषिक,ना धार्मिक ग्रंथ वाचनाला काय नजरे पडत नाही,पंरतु दरवर्षी या सर्व वाचनालयाचे आँडीट होते व या वाचनालयात दोन तीन दैनिक पञा शिवाय काही आढळुन येत नाही तर मग यांची आँडीटमध्ये काही ञुटी का निघत नाही व यांच्यावर कार्यवाही का होत नाही असा साधारण प्रश्न परिसरातील नागरिकांना सतत भेडसावत असतो, अनेक वाचनालये तर कित्येक वर्षा,महीन्यापासुन बंद आवस्थेत आढळुन येतात व यामुळे गावकर्यांची ’’गावात वाचनालय असून अडचण नसून खोळंबा’’ अशी अवस्था झाली आहे,काही वाचनालयचालक आपल्या सोई नुसार वाचनालय उघडतात व बंद करतात येथील काही वाचनाल फक्त शासनाचा निधी लाटण्यासाठी कागदो पत्री चालू असल्याचे निर्दशनात आले व यामुळे गावकर्यांतुन आश्चर्य व्यक्त होत आहे, शासनाने ग्रामीण भागातील लोकांसाठी सार्वजनिक वाचनालय सुरू केले व या वाचनालयाना वर्षा काठी शासनकडुन लाखो रुपयांचे अनुदान मिळते, परंतु परिसरातील अनेक वाचनालय बंद असून कागदोपत्री चालू दाखवून शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान उचलले जात आहे ,व याला तेवढीच तोलामोलाची मदत आँडीटला येणारे संबधीत आधिकारी करताना दिसुन येते, वाचनालय चालकांवर कार्यवाही न करता चेरीमेरी घेऊन आँडीट पास रिपोर्ट करुन घेतात,यामुळे परिसरातील सर्व वाचनालयवाले निडरपणे शासनाचा निधीचा पैसा हडप करतात कारण कुपंनच शेत खात असेल तर या म्हणी प्रमाणे यांना मदत संबधीत आधिकारीच करतात तर यांच्या विरोधात कार्यवाही कोण करणार. तरी संबधीत वरिष्ठ आधिकार्यांनी बोरगाव बाजार व परिसरातील सर्व वाचनालयाची वरिष्ठ पातळीवरुन सखोल आँडीट करावे अशी मागणी परीसरातील वाचन प्रेमीसह,गावकर्यांनी केली आहे.
Leave a comment