औरंगाबाद । वार्ताहर

जैन बांधवांचा महत्त्वाचा समजला जाणारा पर्युषण पर्व यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मंदिरात साजरा न करता घरीच साजरा केला गेला. यावेळी जैन धर्माच्या माग्रर्दशक तत्वानुसार जिओ और जिनेदो  या साठी प्रार्थना केली गेली. पर्युषण पर्व निमित्त घरी जैन धर्माचे भगवान वासुपुंज  भगवान  पुष्पदंत भगवान यांना निर्वाण लाडू चढवण्यात आला तसेच सुगंध दशमीच्या दिवशी घरी भगवंतांच्या समोर फुलाची माळअर्पण करून भगवंताला धूप चढवण्यात आली दररोज उत्त्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच,सत्य, संयम, तप, त्याग, अकिंचन्य, ब्रम्हचर्य असे दहा धर्मावर पुजा करण्यात आली. पर्यूषण पर्व काळात आचार्य देवनंदीजी महाराज आचार्य गुप्ती नंदीजी महाराज व राजाबाजार येथील विशाश्री माताजी यांचे ऑनलाइन प्रवचन सुद्धा भाविकांनी पाहिले.

कोरोना महामारीमुळे राज्यात सर्व मंदिर बंद असल्याने जैन बांधवांनी यावर्षीचा पर्युषण पर्व घरीच साजरा केला. यावेळी सर्वांना सुख,समाधान, आरोग्य, धन, यश मीळुदे. जगावरील हे संकट टळू दे अशी प्रार्थना करण्यात आली. भगवान  पार्श्वनाथ यांचा रोज पंचामृत यावेळी घरातील सर्व  सदस्यांनी शुद्ध सोहळ्याचे वस्त्र परिधान करून भगवंतांच्या अभिषेक केला सदस्यांनी करण्यात आला. यावेळी प्रकाश चंदा सचिन सारिका डॉ राहूल प्रीती संगीता अनिल तन्मय मित आशय अर्थ कीर्ती पियुष कासलीवाल आदींची उपस्थिती होती . त्यानंतर शास्र वाचन, तसेच जप  आरती करण्यासाठी घरातील लहान मुले, महिला, वयोवृद्ध सह पुरुष मंडळी रोज सहभागी होत असत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सरकारच्या नियमानुसार कोणतेही आयोजन संपूर्ण देशात होत नाही. त्यामुळे दिगंबर जैन समाजात निराशा पसरली होती. यावर उपाय म्हणुन श्री भारतवर्षीय दिगंबर जैन युवा महासभा महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश एवं तेलंगाणा शाखेद्वारे पूर्ण भारतभरातील दिगंबर जैन बांधवासाठी डिजीटल पर्युषण पर्वाची संकल्पना सुरु केली गेली होती । याद्वारे जैनम झूम चैनलच्या माध्यमातुन घरी बसल्या दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार होते सकाळी ध्यान, अभिषेक, नित्य नियम पूजा, साधू संतांचे प्रवचन, सामूहिक माळा जाप, तत्वार्थ सूत्रावर व्याख्यान, प्रतिक्रमण, आरती, दशधर्म प्रवचन, विविध सास्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते आशी माहीती नरेंद्र अजमेरा पियूष कासलीवाल यानी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.