गंगापुर । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. या संधीचा फायदा घेत काही व्यापार्‍यांप्रमाणे रेशन दुकानदारांनीही चढ्या दराने धान्य वितरणाचा सपाटा सुरू केला आहे. गंगापूर तालुक्यातील  बाबुळगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 60 चे परवानाधारक चेअरमन देवीदक्षयनी संस्था. शिधापत्रिकाधारकांना मंजूर धान्य न देता, कमी धान्य देणे, तसेच शासकीय दरापेक्षा जास्त दराने धान्य वाटप करणे व धान्य दिल्याची ग्राहकांना पावती न देणे आदी ठपका ठेवत दुकान क्रमांक 60 चा परवाना जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी रद्द केला आहे, देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे.

या दरम्यान अन्य धान्यविना सामान्य कुटुंबांची परवड होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारने मोलमजुरी. करणार्‍या रेशन कार्डधारकांना पुढील 1 एप्रिलपासून प्रत्येक रेशनदुकानांवर धान्य वितरण सुरु झाले आहे, परंतु धान्याचा कृत्रिम तुटवडा भासवून ज्याप्रकारे किराणा दुकानदार चढ्या दराने डाळी व धान्याची विक्री करीत आहेत अगदी तोच फंडा जिल्ह्यातील काही रेशन दुकानदारांनी चालविला होता. याबाबत नागरिकांनी ओरड देखील केली होती धान्य वाटपात गैरव्यवहार करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या.त्यानुसार या दोन्ही दुकानांचा पुरवठा विभागा कडून पंचनामा करण्यात आला. तसेच काही नागरिकांचे जवाब नोंदविण्यात आले आहे. बंदच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये याकरिता सर्व रास्त भाव दुकानदारांना नियमांचे पालन करून धान्याचे वितरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.लॉकडाऊनमध्ये चढ्या दराने धान्याची विक्री रास्त भाव दुकानदार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चढ्या भावाने धान्य वितरित करत असल्याचे तपासणीत उघड झाल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांनी सदर दुकानांचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले.या रास्त भाव दुकानांवर अवलंबून असणार्‍या नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून ही दुकाने नजीकच्या रास्त भाव दुकानाकडे संलग्न करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.