बीड । वार्ताहर
संचारबंदी लागू असतानाही मद्याची अवैध वाहतूक करणारी कार पाठलाग करुन पकडण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.2) रात्री अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव ते भोकरंबा रस्त्यावर ही कारवाई केली. या कारवाईत एका कारसह 57 हजार 600 रुपयांची दारू असा एकुण 2 लाख 7 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महादेव बालासाहेब धारमुडे, (34 रा.दौनापूर ता.परळी) याच्याविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. कारवाई दरम्यान तो फरार झाला. गुरुवारी (दि.2) रात्रीच्या सुमारास निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाईचे निरीक्षक पठाण जवान पाटील ,जारवाल , सादेक अहमद व वाहनचालक डुकरे हे पथकासह संचारबंदी कालावधीत हातभट्टी दारू,अवैध व बनावट दारुची निर्मिती, विक्री तसेच वाहतूक होऊ नये, यासाठी अंबाजोगाई येथे गस्तीवर होते. अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव ते भोकरंबा रस्त्यावर एक कार क्र. (एम.एच. 44 इ 1455) मद्याची अवैध वाहतूक करत असल्याची बातमी मिळाली. त्यांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पथकाच्या शासकीय वाहनाला धडक देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने कारचा पाठलाग सुरु केला. या दरम्यान वाहन चालक कार घटनास्थळी तशीच सोडून फरार झाला. सदरच्या कारमध्ये असलेल्या अवैध दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने सदर कारपुढे एक दुचाकी वाहन चालक एस्कॉर्टींग करताना आढळून आला. त्याने कारमधील वाहनचालकाला लिफ्ट देऊन घटनास्थळावरून घेऊन फरार झाला.
पथकाने कारची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा राज्य निर्मित मेक डॉल नंबर वन व्हिस्कीच्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 384 सीलबंद बाटल्या अशी एकूण 57 हजार 600 रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून जप्त करण्यात आलेल्या वाहनाची किंमतीसह एकूण मुद्देमाल 2 लाख 7 हजार 600 एवढा आहे असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.