मुंबई | वार्ताहर

बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांना तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे पत्र आज देण्यात आले आहे. दरम्यान बीड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा गेल्या आठवडाभरापासून सुरू होती मात्र आता बजरंग सोनवणे यांचे नाव पुन्हा एकदा जाहीर करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बीड लोकसभेसाठी अनेक जण इच्छूक होते. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांनी अखेर बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता बीडमध्ये भाजप-महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत होणार आहे. गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना पाच लाखाहून अधिक मते मिळाली होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.