नाट्यपरिषदेच्या बीड शाखा अध्यक्ष डॉ.दिपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन
बीड । वार्ताहर
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शतकपूर्ती म्हणजे शंभरावे नाट्य संमेलनानिमित्त विभागीय नाट्यसंमेलन दि.1 व 2 फेब्रुवारी 2024 रोजी बीड येथे संपन्न होत आहे. यानिमित्त नाट्यपरिषदेच्या बीड शाखेच्या अध्यक्ष डॉ.दिपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन सौ.के.एस.के. महाविद्यालयात गुरुवारी (दि.11) करण्यात आले.
यावेळी अ.भा.म.ना.प. बीडचे उपाध्यक्ष डॉ.विद्यासागर पाटागणकर, कार्यवाह डॉ.संजय पाटील देवळाणकर, प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे, कमवि उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, डॉ.सुधाकर गुट्टे, डॉ.विश्वांभर देशमाने, प्रदिप मुळे, मिलींद शिवणीकर, डॉ.रूक्मिनीकांत पांडव, डॉ.अनिता शिंदे, प्रा.नामदेव साळूंके, डॉ.दुष्यंता रामटेके, डॉ.सुरेखा जोशी, डॉ.विजय राख यांच्यासह सदस्य व रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी नाट्यपरिषदेच्या बीड शाखेच्या अध्यक्ष डॉ.दिपाताई क्षीरसागर म्हणाल्या की, आपल्या बीडमध्ये आयोजित नाट्यसंमेलने यशस्वी झालेले आहे. तसेच, हे विभागीय नाट्य संमेलनही न भूतो न भविष्यती याप्रमाणे आपणास यशस्वी करावयाचे आहे. त्यासाठी अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे बीड शाखेचे सर्व सदस्य, रसिक, श्रोते व बीडकरांनी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
Leave a comment