मोदींकडे आग्रह करून ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता काढून घेण्यासाठी प्रयत्न करणार

मोदीजींची परवानगी समजून मुस्लिमांना वचन देते की, हा देश जेवढा तुमच्या आजोबा पणजोबांचा आहे तेवढाच तुमचा देखील राहिल

अंबाजोगाई । वार्ताहर

ही निवडणूक देशाचे आणि जिल्ह्याचं भलं करण्यासाठी विकासाच्या मुद्यावर आपल्याला लढवायची आहे. त्यामुळे मतदारांनो, निवडणूकीत जातीय सलोख्याची तस्करी होऊ देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जिल्ह्यात मतदानरूपी आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत.मोदींकडे आग्रह करून ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता काढून घेण्यासाठी आगामी काळात मी प्रयत्न करणार आहे. मोदीजींची परवानगी समजून मुस्लिमांना वचन देते की, हा देश जेवढा तुमच्या आजोबा पणजोबांचा आहे तेवढाच तुमचा देखील राहिल. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला आपले मतरुपी आशीर्वाद द्या, तुमचे मत विकासासाठी सत्कारणी लावेल अशी ग्वाही भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.

   कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलोट जनसागराच्या साक्षीने विराट जाहीर सभा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पंकजाताई मुंडे म्हणाल्या,  मी विकास केला आहे हे जनता मान्य करते. ही निवडणूक विकासासाठी आहे, राज्याला आणि जिल्ह्याला एकच सरकार हवे आहे.. देशासाठी काम करायची संधी आहे. पक्षाचा आदेश मानणारे आम्ही आहेत. विकासाबरोबर तरुणाचे भान हरपलं नाही पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचे आहे. , जो वंचित, उपेक्षित आहे, ज्याचा कोणी वाली नाही त्याची सेवा करण्यासाठी माझ्या पित्याने मला राजकारणात आणलं असल्याचे त्या म्हणाल्या.

तुम्हीच माझे मुंडे साहेब, तुम्हीच माझी उर्जा

मला पाच वर्षे मुंडे साहेबांनी मागितले होते मात्र त्यापुर्वीच त्यांचे  निधन झाले. आता तुम्हीच सर्वजण माझे मुंडे साहेब आहात. तुम्हीच माझी उर्जा आहात.असे सांगत तुम्हीच माझी या निवडणुकीत काळजी घ्या. तुमच्या सेवेसाठी मी काम करणार आहे. या निवडणूकीसाठी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, तुम्ही आता निर्धाराने काम करा. आपला विजयाचा निकाल आता कोणीही बदलू शकत नाही. मला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. बीड जिल्ह्यातील जमीन ओलिताखाली आणायची आहे. शेतकरी ऊस तोड कामगारांचे जोवन उंचावण्यासाठी काम करायचं आहे, मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मला हे काम आगामी पाच वर्षात करायचे आहे. जिल्ह्यातील 10  हजार तरुणांना जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून घ्यायचा आहे. जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय उभारायचे आहे.  मुस्लिम समाज बांधवांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. त्यामुळे थकायचे आणि रुकायचे नाही विकासासाठी काम करत रहायचे असे सांगत पंकजाताई मुंडे यांनी आता निर्धाराने कामाला लागा, अधिकाधिक मतदान मिळवा, जिल्ह्याच्या विकासासाठी मला प्रचंड मतांनी विजयी करुन संसदेत पाठवा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

कोशिश करनेवालोंकी हार नही होती..

यावेळी पंकजाताईंनी आपल्या भाषणात म्हटलेली कविता खूप काही सांगून गेली.डुबकिया सिंधू में गोताखोर लगाता है, जा जा कर खाली हाथ लौटकर आता है। मिलते नही सहज ही मोती गहरे पाणी में, मुठ्ठी उसकी खाली हर बार नही आती, कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती। या कवितेच्या ओळीने टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.