औरंगाबाद । वार्ताहर

जिल्हा सामान्य रुग्णालयातील (मिनी घाटी) किराडपुरा येथील कोरोना रुग्णाची दुसरी चाचणी निगेटीव्ह आल्याने हा 49 वर्षीय रुग्ण कोरोनामुक्त झाला. तर शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे भीमनगर, भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय कोरोनाबाधित महिला आणि आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय पुरूष या दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशीरा 52 आणि 25 वर्षीय रुग्णांची कोविड(कोरोना) चाचणी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 38 झाली आहे. 

मिनी घाटीतून एकाला सुटी, 15 वर उपचार-मिनी घाटीतून आज दुपारी किराडपुरा येथील 49 वर्षीय कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाला. त्यांची दुसरी चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे मिनी घाटीतील सर्व डॉक्टर, पारिचारिका, ब्रदर, अधिकारी, कर्मचारी यांनी रुग्णास टाळ्या वाजवून निरोप दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ.पद्मजा सराफ आदींची उपस्थिती होती. मिनी घाटीत आज एकूण 69 रुग्णांची तपासणी करण्यात आली. चार जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या कोविड विलगीकरण कक्षात 15 रुग्ण दाखल आहेत. एकूण 61 जणांचे स्वॅब घेण्यात आले. काल आणि आजचे मिळून 30 जणांचे स्वॅब अहवाल नमुने प्राप्त झाले आहेत. तर 29 नमुने अहवाल येणे बाकी आहेत. संशयित असलेल्या 31 जणांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आल्याचे मिनी घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

रुग्ण कोविड केअर सेंटरमधून घाटी, मिनी घाटीत-समता नगरातील अजून दोघा पुरूषांची कोविड चाचणी मंगळवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आली. त्यांचे वय 51 आणि 25 आहे. महानगरपालिकेच्या एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथील कोविड केअर सेंटरमधून त्यांचा स्वॅब जिल्हा सामान्य रुग्णालयाद्वारे घाटीतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यांचा अहवाल मंगळवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आल्याने त्या दोन्ही रुग्णांपैकी एकास (वय 25) जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे तर एकास (वय 51) घाटीमध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याचे महानगरपालिकेच्या डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.

घाटीत दोन कोविड रुग्णांचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू-भीमनगर, भावसिंगपुरा येथील 76 वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्याने 21 एप्रिल रोजी सकाळी 7.10 वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकृती अत्यंत गंभीर व कोविड (कोरोना) संशयित असल्याने परत एकदा खबरदारी म्हणून त्यांच्या लाळेचे नमुने मृत्यूनंतर घेण्यात आले होते. सदरील नमुन्याचा 21 एप्रिल रोजी रात्री 8.10 वा. कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय पुरूष असलेल्या कोरोनाबाधिताचेही 22 एप्रिल (बुधवार) रोजी रात्री 2.50 वाजता उपचारादरम्यान निधन झाल्याचे औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.मिनाक्षी भट्टाचार्य आणि घाटीचे नोडल अधिकारी (माध्यम समन्वयक) अरविंद गायकवाड यांनी सांगितले.  चार दिवसांपासून ताप, दमा आजाराने भीमनगर येथील 76 वर्षीय महिला त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांना बेशुद्ध अवस्थेत 19 रोजी अपघात विभागात आणले होते. त्यांच्या शरीरात 50 टक्के ऑक्सिजनचे प्रमाण असल्याने अपघात विभागात कृत्रिम श्वासोश्वास सुरू करण्यात आला होता, तसेच कोविड इमारतीतील अतिदक्षता विभागात त्यांना भरती केले होते. तर 19 रोजीच त्यांची कोविड चाचणी केली होती, चाचणी मात्र निगेटिव्ह आली होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभाग येथे कोविड आजाराचे उपचारही सुरू होते. त्यांना बर्‍याच वर्षांपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता.

आरेफ कॉलनीतील 60 वर्षीय कोरोनबाधित 19 रोजी सकाळी 11 वाजता  अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तीव्र ताप, अंगदु:खी, खोकला, डोकेदु:खी व दमा या लक्षणांवरून त्यांना कोविड संशयित रुग्ण म्हणून भरती करून घेण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 60 टक्के होते. त्यांना कृत्रीम श्वासावर ठेवण्यात आले होते. 19 रोजी त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दोन्ही बाजूचा न्यूमोनियाबरोबरच रक्तातील कोऍग़्युलोपॅथी वाढल्याने त्यांच्यावर कृत्रीम श्वासाबरोबर इतर सर्व औषधोपचार नियमितप्रमाणे सुरू होते. प्रकृती खालावल्याने बायलॅटरल न्यूमोनिया, श्वसनाचा आजार, कोविडसह कोऍग़्युलोपॅथी या आजाराने त्यांचा 22 रोजी मृत्यू झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. तर मागील चोविस तासात दुपारी चार वाजेपर्यंत घाटीमध्ये 38 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी चार जणांचे स्वॅब घेण्यात आले.त्यापैकी तीन स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला. एका रुग्णाचा अहवाल येणे बाकी आहे.सध्या घाटीच्या डेडिकेटेड रुग्णालयात समता नगरातील 38 वर्षीय आणि 51 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर रुग्णालयात 20 रुग्ण भरती आहेत, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. तर कोविड व्यतिरिक्त अन्य एका रुग्णाचा रेस्पीरेटरी फेल्युअर ड्यूटू क्रोनिक ऑबस्ट्रक्टव्हि पलमोर डिसीज आजाराने मृत्यू झाला. तर आठ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याचेही  डॉ. येळीकर यांनी म्हटले आहे.

घाटीत दोन, मिनी घाटीत 15 कोरोनाबाधितांवर उपचार

भीमनगरातील 76 वर्षीय महिला, समता नगरातील 51 व 25 वर्षीय या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 38 वर पोहोचली आहे. त्यापैकी आज किराडपु-यातील एका रुग्णाला आज सुटी मिळाल्याने आतापर्यंत एकूण 16 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त झाले आहेत. 76 वर्षीय महिला, आरेफ कॉलनीतील पुरूषासह आतापर्यंत पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. म्हणून सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 15 आणि घाटीत दोघा अशा एकूण 17 जणांवर उपचार सुरू आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.