युवासेना आणि एकनाथराव घुगे प्रतिष्ठानचा वंचितांना मदतीचा हात !

जालना -वार्ताहर   - स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना मुळातच ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर स्थापन केलेली आहे. संकटात सापडलेल्यांना मदत करणे हाच शिवसेनेचा धर्म असून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासारख्या युवा सैनिकाने लॉकडाऊनच्या काळात परिसरातील गावागावात गहु- ज्वारीसह किराणा सामानाच्या किट वाटपाचा हाती घेतलेला संकल्प पूर्ण करतांना खर्याअर्थाने आनंद होत आहे, असे प्रतिपादन युवा सेनेचे विस्तारक श्री. अभिमन्यू खोतकर यांनी  केले. 

युवासेना आणि एकनाथराव घुगे प्रतिष्ठानच्या वतीने श्री. भाऊसाहेब घुगे यांच्या माध्यमातून बदनापूर तालुक्यातील भराडखेडा, गेवराई बाजार ,कडेगाव, चितोडा, शेलगाव ,बदनापूर, नवा मोंढा जालना येथील गोरगरीब, वंचित आणि हातावर पोट असणार्या जनतेसाठी मास्क, दोन किलो गव्हाचे पिठ, दोन किलो चावल, दोन किलो ज्वारी ,एक किलो मीठ, एक किलो पोहे, दोन किलो कांदे, दोन किलो आलू, एक किलो साखर ,डेटॉल साबण ,दोन बिस्कीट पु डे, तिखट मसाला, हळद पावडर, अडीच किलो गहू,ज्वारी अशा प्रकारे सामानाची किट तयार करुन ती निराधार महिला, हातावर पोट असलेल्या कामगारांसह शेतकरी, व  बांधकाम कामगार, वृद्ध महिला, गावातील मजूर, अपंग व्यक्ती यांना दीड हजार कीट मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आल्या. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व युवा सेना प्रमुख तथा पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. पाटील बोराडे, माजी आ. संतोष सांबरे, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चौथे, हिकमत उढाण, उपनेते लक्ष्मणराव वडले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे विस्तारक तथा जालना जिल्हा युवासेना संपर्कप्रमुख अभिमन्यू खोतकर यांच्या हस्ते आणि जि प सदस्य भानुदास नाना घुगे, डॉ. प्रमोद डोईङ्गोडे, अमोल करंजीकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकूर, तालुकाप्रमुख अजय कदम, सरपंच भगवान बारगजे, ग्रा. पं. सदस्य संतोष मुळक, बाबासाहेब दराडे,चेअरमन रामदास बारगजे, नगरसेवक जगन्नाथ बारगजे, सखाराम जावळे, गोपीनाथ मुळक, दीपक दिघे, रामेश्‍वर दराडे विष्णू दराडे, बद्री प्रल्हाद मुळक, शिवाजी दराडे, दत्तू पाटील दराडे, ज्ञानेश्‍वर मुळक, गजानन लहाने ,सुरेश घोरपडे, योगेश जाधव, योगेश लहाने, गणेश कोल्हे ,कृष्णा कोल्हे, श्री. तारो, प्रल्हाद मुळक, समाधान दराडे, अर्जुन तुपे, विलास तुपे, भानुदासराव डीघे,गोपीनाथ डीघे यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. 

मास्क व सॅनिटायझर्स वाटप करणार-घुगे यावेळी बोलतांना श्री. भाऊसाहेब घुगे म्हणाले की, समाजसेवेच्या भावनेतून सुरु केलेले हे काम करतांना मनस्वी आनंद होत आहे. कोरोना आजाराच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता परेशान झालेली आहे. सामान्य नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळेच आपण ग्रामीण भागातील जनतेला ङ्गुल ना ङ्गुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचे ठरवले आहे. यापुढे परिसरातील गावामध्ये पाच हजार मास्क आणि एक हजार सॅनिटायझर्सच्या बाटल्यां वितरीत करण्यात येणार असल्याची माहितीही प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब घुगे यांनी यावेळी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.