माजलगाव । उमेश जेथलिया

माजलगाव नगरपरिषदेच्या कर्मचारी वर्गाने रविवारी (दि.19) आपत्ती प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन करणार्‍या विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडली.यात फळ भाजी विक्रेत्यासह, मास्क न लावणार्‍या विरोधात दण्डत्मक कारवाई करण्यात आली.
13 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार मुख्य रस्त्यावर फळ व भाजी विक्री करणारे 17 व्यापारी यांना सूचना देऊनही न ऐकल्यामुळे त्यांचे वजन काटे जप्त करण्यात आले. प्रत्येकी 500 रु दंड घेऊन हे वजनकाटे परत देण्यात आले तसेच मास्क न लावणार्‍या विरोधात कडक कारवाई करण्यात आली.दंड भरण्यास असमर्थता दाखवणार्‍यांना भरचौकात उठाबशा करण्यास लावल्या तर काही जेष्ठ नागरिकांचे गांधीगिरी करून गुलाब पुष्प देण्यात आले. न.प.चे कार्यालयीन अधिक्षक गणेश डोंगरे, नगर रचनाकार आशिष तुसे, स्वच्छता पाणी पुरवठा जगदीश जाधवर,संतोष घाडगे,कुमार जावळे,विलेश कांबळे,आरेफ चांद,संकेत साळवे,सय्यद इम्रान,सिकंदर खान, सुधाकर उजगरे, भगवान कांबळे यांनी ही धडक कारवाई केली.

नगरसेवकांकडून सहकार्याची अपेक्षा

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंणघन करणारांना तहसीलदार यांच्या आदेशानुसार न.प.चे कर्मचारी पाचशे रुपये दंड आकारून पावत्या देत असताना माजलगाव न.प.तील काही नगरसेवक दंड करू नका म्हणत शिवीगाळ करत असून कर्मचार्‍यांना धमक्या देत आहेत वरून मी मास्क नाही घातला माझं काय वाकडं करायच ते करा अशी उर्मट भाषा वापरत आहेत.अशा वृत्तीमुळे न.प.कर्मचार्‍यांना शहरात काम करणे मुस्किल झाले आहे.
----

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.