नेकनुर/मनोज गव्हाणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी शिवाय अधिकारी-कर्मचारी यांच्या करिता निर्जंतुकीकरण गरजेचे असल्याने प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरणासाठी नेकनुर पोलीस स्टेशनमध्ये प्रवेशद्वारावरच फवारणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांना या परिस्थितीत मोठी जोखीम असल्याने शिवाय पूर्णवेळ प्रत्येकाशी येणारा संपर्क धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने शिवाय अनेक ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोना विषाणूने घेरल्याचे स्पष्ट झाल्याने खबरदारी म्हणून नेकनुरचे स.पो.नी. सचिन पुंडगे यांनी पुढाकार घेत प्रवेशद्वारावरच निर्जंतुकीकरण कक्ष शनिवारी कर्मचार्‍यांच्या मदतीने उभा केला. तक्रार अथवा कुठलेही काम असणाऱ्या व्यक्तीचा शिवाय अधिकारी-कर्मचारी यांचाही निर्जंतुकीकरण करूनच प्रवेश होणार आहे. सोडियम हायपो क्लोराईड याचा पाण्यात वापर करून फवारणी केली जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.