अफवांचे पेव;प्रशासनाची धांदल

माजलगाव:| उमेश जेथलिया
परभणी जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईकांची परभणी मनपा कडुन चौकशी होत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि केवळ नांमसाधर्म्य मुळे व व्हिडीओ तील अर्धवट माहिती मुळे चिंच गव्हाण परिसरा व माजलगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आणि अफवांचे पेव आणि प्रशासनाची धांदल यामूळे 17 एप्रिल ची दुपार कोरोनामय झाली होती
पुण्याहून आलेला परभणी येथील कोरोना पॉझिटिव्ह माजलगाव-पाथरी मार्गे परभणी ला गेला आणि जाताना तो माजलगाव ला थांबला अशी अफवा काल दुपारी तालुक्यात पसरली आणि एकच खळबळ उडाली अफवांच्या मुळाशी जाण्याचा दै लोकप्रश्न ने प्रयत्न केला असता परभणी मनपा पदाधिकारी कडून वस्तुनिष्ठ माहिती न देता व्हायरल करण्यात आलेला व्हिडीओ मुळाशी असल्याचे दिसून आले.
परभणी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर तो रुग्ण परभणी एमआयडीसी च्या मागील बाजूस असलेल्या त्याच्या मेव्हण्याकडे मुक्काम ला असल्याचे मनपा प्रशासनास माहीत झाले आणि मनपा ची टीम त्या ठिकाणी जाऊन पां... नामक व्यक्ती ची चौकशी करत असल्याचे या व्हिडिओ त स्पष्ट दिसते .व्हिडिओ च्या शेवटी मनपा तील पदाधिकारी लोकांना निवेदन करत असल्याचे दाखवण्यात आले मात्र सदर च्या व्हिडीओ त कोठे ही परभणी असा उल्लेख नसून निवेदन कर्त्याने ही स्वतः चे नाव,ठिकाण वेळ काहीच निवेदनात ना सांगितल्या मुळे व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर माजलगाव च्या सीमेवर असलेल्या पुनर्वसित चिंचगव्हाण येथील नाम साधर्म्य व ठिकाण साधर्म्य असलेल्या व्यक्ती च्या नावाने माजलगाव तालुक्यात अफवांचे एकच पेव फुटले पत्रकार व प्रशासन यांना फोन करून विचारणा सुरू झाली आणि आरोग्य,महसूल व पोलीस प्रशासनाचा ताफा चिंचगव्हाण मध्ये दाखल झाला.सदर व्यक्तीची चौकशी ही सुरू झाली मात्र यात कसलेच तथ्य नसल्याचे आढळून आले आणि ही केवळ त्या परभणी च्या व्हिडीओ मुळे उडालेली खळबळ असल्याचे ही लक्षात आले.प्रशासनाने अधिकची काळजी घेऊन योग्य पावले उचलली आहे.
चौकट
आम्ही दक्ष आहोत-पी आय बुधवन्त
आम्ही आरोग्य प्रशासनाच्या मदतीने चिंच गव्हाण परिसरात भेटून पूर्ण चौकशी केली असता परभणी चा रुग्ण माजलगाव मध्ये थांबल्याची कोणती ही माहिती मिळाली नाही ती केवळ एक अफवा होती तरी ही पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासन याबाबत पूर्ण काळजी घेत आहे असे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवन्त यांनी लोकप्रश्न ला सांगितले

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.