औरंगाबाद । वार्ताहर
एन- ४ येथील कोरोना पॉझिटिव्ह ५८ वर्षीय महिलेचे दोन्ही स्वॅब निगेटिव्ह आले. त्यामुळे बुधवारी सायंकाळी या महिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दोन आठवड्यात महिलेने कोरोनावर मात केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील महिलेचे पती दिल्लीहून औरंगाबादेत परतले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. कोरोनाच्या लक्षणामुळे तपासणी करण्यात आली होती. मात्र, पतीसह अन्य नातेवाईक कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, ही ५८ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली. दोन आठवड्यात केली मात
यानंतर जिल्हा रुग्णालयात ३० मार्चपासून महिलेवर उपचार सुरू होते. उपचाराच्या १४ व्या आणि १५ व्या दिवशी या महिलेचे २४ तासात दोन स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. या दोनपैकी एक अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला होता. दुसरा अहवाल काय येतो, याकडे जिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणेनेचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी रात्री हा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निःश्वास घेतला.
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तसेच पालक मंत्री सुभाष देसाई यांनी नुकतीच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी तापीचे क्लिनिक स्थापित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनामध्ये अशा स्वरुपाच्या फीव्हर क्लिनिक आणि रुग्णालयांची तीन भागांत विभागणी करणार असल्याची माहिती दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये फीव्हर क्लिनिक स्थापित करण्यात आले आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे, औरंगाबाद जिल्हा कोरोना व्हायरसच्या बाबतीत रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. या जिल्ह्यात कोरोनाचे 25 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जण यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या एकूण 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये पोलिस आणि प्रशासनाकडून सक्तीने लॉकडाउनची अंमलबजावणी केली जात आहे. सोबतच, लोकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे.
Leave a comment