भराड़ी । वार्ताहर
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने तसेच राशन पुरवठा सिल्लोड तालुक्यातील सद्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय राज्यमंत्री मा ना रावसाहेब पाटील दानवे साहेब यांनी आढावा बैठक घेतली, यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे साहेब, तहसीलदार रामेशवर गोरे साहेब,गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे साहेब , नायब तहसीलदार पुरवठा विभाग सोनवने साहेब, सिल्लोड सोयगाव विधानसभा नेते प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश भाऊ बनकर, भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोटे, सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन इद्रीस मुलतानी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील मिरकर, नगरसेवक किरण पाटील पवार, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील वानखेडे कमलेश कटारिया आदींसह महसुल विभाग , आरोग्य विभाग, पंचायत विभाग, नगरपालिका अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये मा. केंद्रीय राज्यमंत्री अन्न नागरी पुंरवठा रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड तालुक्यामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखणे साठी उपाययोजना बाबत आढावा घेतला. यामध्ये डॉ अमित सरदेसाई वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड व डॉ रेखा भंडारी तालुका आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली. उपविभागीय अधिकारी सिल्लोड ब्रिजेश पाटील व तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले कि, सिल्लोड येथे उपजिल्हारुग्णालय, समाजकल्याण विभागाचे मुलीचे वसतिगृह , राजर्षी शाहू सभागृह सिल्लोड , स्वामी विवेकानंद विद्यालय सिल्लोड व लिटील वंडर इंग्लिश स्कूल डोंगरगाव फाटा सिल्लोड येथे कोरोना केअर सेंटर ची स्थापना करण्यात आली आहे तसेच यामध्ये एकूण 500 बेड ची व्यवस्था करण्यात आली आहे .सिल्लोड तालुक्यामध्ये एकूण 3085 नागरिक यांना केाश र्टीीरपींळपश ठेवण्यात आले होते. यापैकी 2052 नागरिक यांचा केाश र्टीीरपींळपश कालावधी पूर्ण झाला आहे. उर्वरित नागरिक यांचेवर लक्ष देण्यात येत आहे. तसेच सिल्लोड तालुक्यामध्ये आशा अंगणवाडी सेविका तसेच इंतर कर्मचारी हे गावागावात डोअर टू डोअर तपासणी सुरु आहे.आज रोजी पर्यंत सिल्लोड तालुक्यामध्ये कोरोना आजाराने संशयित किवा कोरोना सदृश एक हि रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच सिल्लोड शहरासाठी उपाययोजना या बाबत सिल्लोड नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी सांगितले कि, शहरामध्ये आवश्यक ठिकाणी येणार्या व जाणा-या नागरिकांना सॅनिटायाझ करण्यात येत आहे. तसेच मास्क व साबण वाटप केले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री अन्न नागरी पुंरवठा श्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड तालुक्यामध्ये पंतप्रधान जनाधन योजने बाबत आढावा घेतला यामध्ये प्रकाश दाभाडे गट विकास अधिकारी प.स. सिल्लोड यांनी सांगितले कि, तालुक्यामध्ये एकूण 16570 लाभार्थी असून यापैकी 8290 लाभार्थी यांचे खात्यावर 500 प्रमाणे पैसे जमा झाले आहे. उर्वरित जमा करण्याचे काम सुरु आहे. तद्नंतर पंतप्रधान किसन सन्मान योजने बाबत आढावा घेतला असता सिल्लोड तालुक्यामध्ये एकूण 51000 लाभार्थी असून या पैकी 1717 लाभार्थी यांचे आधार प्रमाणीकरण न झाल्याने संबंधीत यांना पंतप्रधान किसन सन्मान योजने चा लाभ तिसरा हप्ता मिळाला नाही. सदर आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच संबंधीत यांना लाभ मिळेल असे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या तीन महिने मोफत तांदूळ वाटप बाबत आढावा घेतला यामध्ये प्रत्येक लाभार्थी यांना त्यांचे धान्य वेळेवर मिळेल याबाबत खबरदारी घ्यावी अशी सूचना केली . तसेच पंतप्रधान उज्वला योजना बाबत आढावा घेतला यामध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये एकूण 20592 लाभार्थी असून यांना गस टाकी भरून देण्याबाबत कार्यवाही सुरु आहे असे नायब तहसीलदार पुरवठा श्री संजय सोनवणे यांनी माहिती दिली . सदर बैठकीस उपविभागीय अधिकारी सिल्लोड ब्रिजेश पाटील, नायब तहसीलदार महसूल किरण कुलकर्णी, गट विकास अधिकारी प स सिल्लोड प्रकाश दाभाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, सपोनि श्रीमती लांडगे , मुख्याधिकारी सिल्लोड नगर परिषद रफिक सय्यद अमित सरदेसाई वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड व डॉ रेखा भंडारी तालुका आरोग्य अधिकारी, नायब तहसीलदार महसूल किरण कुलकर्णी , नायब तहसीलदार संजय सोनवणे, इद्रीस मुलतानी चेअरमन सिद्धेश्वर साखर कारखाना भवन, भाजपा. तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे, सुनील मिंरकर, मनोज मोरेल्लू, कमलेश कटारिया व इंतर उपस्थित होते.
Leave a comment