औरंगाबाद । वार्ताहर
ज्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात झाला आहे. तसेच जे ठिकाण कोरोनाग्रस्त हॉटस्पॉट जाहीर झालेले आहेत आहेत अशा राज्यातून प्रवास करून येणार्‍या लोकांनी औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पोलीस प्रसानाची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे.त्याशिवाय त्यांना जिल्हयात प्रवेश करता येणार नाही.तरी जनतेने कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेऊन नियमांचे पालन करत प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस अधीक्षक औरंगाबाद (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन तसेच प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे.त्यापार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.या परिस्थितीत ज्या ज्या शहरांमध्ये अथवा जिल्ह्यांमध्ये कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात झाला आहे जसे की मुंबई व बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, मालेगाव, इत्यादी ठिकाणाहून तसेच कोरोनाग्रस्त हॉटस्पॉट जेथे आहेत अशा राज्यातून प्रवास करून येणार्‍या लोकांनी औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. विनाकारण अथवा भावनिक कारणे दाखवून परवानगी शिवाय प्रवेश करू इच्छिणार्‍या लोकांवर बंदी घालण्यात येत आहे.
सर्व खाजगी तसेच सरकारी रुग्णवाहिके मधून देखील प्रवास करून येणार्‍या या जिल्ह्यातील रुग्ण अथवा चालक यांनी देखील त्यांच्या तेथील जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे अत्यावश्यक राहील. अन्यथा जिल्ह्याच्या सीमेवर असणार्‍या तपास नाक्यावरून त्यांना परत पाठविले जाईल याची सर्व जनतेने, संबंधितांनी नोंद घ्यावी. औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे ज्या उपाययोजना केल्या जात आहे त्याच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे सर्वात जास्त आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आवाहन आपल्या समोर आहे त्यासाठी कटाक्षाने स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याला घातक ठरेल असे काहीही करु नये. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे आणि विनाकारण विनापरवाना कोणीही जिल्ह्यात येणार नाही याची सर्वांनी आपापल्या स्तरावर दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस अधीक्षक औरंगाबाद (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.