-चेअरमन रिकबचंद सोळंकी,व्हाईस चेअरमन शेख खालेद शेख ताहेर चाऊस यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
सहकार क्षेत्रात सहा वर्षांपुर्वी स्थापन झालेल्या व अल्पावधीत नावारूपास आलेल्या श्री योगेश्वरी मल्टीस्टेट को.ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीने गुंतवणुकदार,ठेवीदारांचा आणि अंबाजोगाईकरांचा विश्वास संपादन करत अल्पावधीत सुमारे 18 कोटी रूपयांच्या ठेवी जमविल्या आहेत.तसेच परिसरातील लघुउद्योजकांना 13 कोटी 98 लाखांहून अधिकचे कर्ज वाटप केले आहे.गत आर्थिक वर्षांत मल्टीस्टेटला 25 लाख रूपयांचा नफा झाला असल्याची माहिती मल्टीस्टेटचे चेअरमन रिकबचंद सोळंकी,व्हाईस चेअरमन शेख खालेद शेख ताहेर चाऊस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शहरातील सामान्य नागरिकांना,लघु उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहा वर्षांपुर्वी म्हणजे 30 ऑगस्ट 2013 रोजी सहकार क्षेत्रात योेगेश्वरी मल्टीस्टेट को.ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीची स्थापना राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यल्प अशा पाच लाख रूपये भाग भांडवलावर करण्यात आली.सुरूवातीपासूनच बचतीच्या माध्यमातून लघुउद्योगांसाठी कर्जे देवून नवउद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम या मल्टीस्टेटने केले आहे. आज ही मल्टीस्टेट अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांसाठी ख-या अर्थाने आधारवड ठरली आहे.मल्टीस्टेटने केवळ सहा वर्षांतच जमविलेल्या ठेवी व झालेला नफा यावरून अंबाजोगाईकरांचा विश्वास संपादन केला असल्याचेच दिसून येत आहे.श्री योगेश्वरी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात चेअरमन रिकबचंद सोळंकी,व्हाईस चेअरमन शेख खालेद शेख ताहेर चाऊस यांनी म्हटले आहे की,30 ऑगस्ट 2013 रोजी सुरू केलेल्या या मल्टीस्टेटची 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 अखेर सभासदांची संख्या-1749 इतकी असून सभासद भाग भांडवल 47 लाख इतके आहे.तर मल्टीस्टेटने 9 कोटी 50 लाख रूपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे. मल्टीस्टेटने केवळ सहा वर्षांत 18 कोटी रूपयांच्या ठेवी जमविल्या आहेत. मल्टीस्टेटने 13 कोटी 98 लाख रूपयांहून अधिकचे कर्जवाटप केले आहे.तर 31 मार्च 2020 अखेर मल्टीस्टेटला चालु आर्थिक वर्षात 25 लाख रूपयांचा नफा झाला आहे.शहरातील छोटे-मोठे व्यापारी ज्यात बेकरी उद्योग,फळ व भाजीपाला विक्रेते,लघुउद्योजक या व्यावसायिकांना श्री योगेश्वरी मल्टीस्टेट ही आपली बँकच वाटू लागली आहे.कारण,तशी ओळखच या मल्टीस्टेटने अल्पावधीत निर्माण केली आहे.सामान्य माणसाला कर्ज वाटप करून मल्टीस्टेटने आर्थिक आधार दिला आहे.मल्टीस्टेटच्या वतीने स्वप्नपुर्ती या आकर्षक ठेव योजनेला ठेवीदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.1 मार्च 2019 पासून श्री योगेश्वरी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे नविन मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर दिला जात आहे. मल्टीस्टेटची संपुर्ण शाखा संगणकीकृत असून विनम्र व तत्पर सेवा ही या मल्टीस्टेटची काही वैशिष्ट्ये आहेत.मल्टीस्टेटची दामदुप्पट योजना, मल्टीस्टेटकडे कमी वेळेत, खर्चात व कमी व्याजदरात सोने तारण कर्ज,सभासद कर्ज,वाहन कर्ज,पगार तारण कर्ज, कॅश क्रेडीट लोन या विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत.त्यामुळे अंबाजोगाईतील सभासद, खातेदार,ठेवीदार,नागरिक आणि नवउद्योजकांचा ओढा सध्या योगेश्वरी मल्टीस्टेटकडे वाढला आहे.18 कोटी रूपयांच्या ठेवी जमवून योगेश्वरी मल्टीस्टेट ही आर्थिक प्रगतीकडे वेगाने झेपावत असल्याचे चेअरमन रिकबचंद सोळंकी,व्हाईस चेअरमन शेख खालेद शेख ताहेर चाऊस यांनी सांगितले. मल्टीस्टेटच्या सर्वांगिण प्रगतीत व विकासात बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व या मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.तसेच मल्टीस्टेटच्या सर्वांगीण वाटचालीत व विकासात संचालक सर्वश्री सुधाकर हरीश्चंद्र टेकाळे,अ‍ॅड.विलास शिवाजीराव लोखंडे,आशालता विश्‍वजीत वांजरखेडकर,शेख अन्वर शेख वली हसन,धर्मराज किसनराव बिरगड,सौ.प्रज्ञा अनिल लोमटे,विलास सिद्राम जाधव, भागवत रामकृष्ण मसने,आप्पासाहेब ञिंबकआप्पा संकाये,कांतीलाल नंदलाल शर्मा (कान्हाभाऊ),अ‍ॅड.सचिन लक्ष्मीकांत बजाज यांच्या सहित मल्टीस्टेटचे व्यवस्थापक श्री.ढगे, कर्मचारी,पिग्मी एजंट आणि सर्व सभासद,ठेवीदार, खातेदार,कर्जदार व समस्त अंबाजोगाईतील नागरिक आदींचे वेळोवेळी सहकार्य लाभले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.