शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी

भाजप शहराध्यक्षावर गुन्हा
_______________

गेवराई (प्रतिनिधी)
पास जवळ नसताना पेट्रोलची मागणी करुन पेट्रोल देतो की नाही अशी अरेरावी करून पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नगरसेविकेचे पती तसेच भाजपा शहराध्यक्ष असलेल्या एकावर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची घटना शुक्रवार दि.१० रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गेवराई शहराजवळ असलेल्या कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंप येथे घडली.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, गेवराई शहराजवळ असलेल्या कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी शुक्रवार दि.१० रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरातील दाभाडे गल्ली येथील नगरसविकेचे पती तसेच भाजपा शहराध्यक्ष याहियाखाॅ नादुमियाॅ पठाण हे आपल्या बुलेटवर आले व पेट्रोल दे असे म्हणाले तेव्हा पेट्रोल पंप भरणारे श्रीकिसन मारोती जोंधळे यांनी त्यांना आपण पास सोबत आणला आहे का, असे विचारले असता याहियाखाॅ पठाण ते म्हणाले की मी पास नाही आणला तु मला गुपचूप पेट्रोल टाक तेव्हा जोंधळे यांनी पेट्रोल टाकण्यास साफ नकार दिल्याने भाजपा शहराध्यक्ष याहियाखाॅ पठाण यांनी त्यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांचा गोंधळ ऐकून कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंपाचे मॅनेजर संभाजी मोटे बाहेर येवून त्यांच्यातील भांडणे मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना याहियाखाॅ पठाण यांनी त्यांना शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात नगरसेवक पती व भाजपा शहराध्यक्ष याहियाखाॅ नादुमियाॅ पठाण यांच्या विरुद्ध श्रीकिसन जोंधळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड या करीत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.