बीड पोस्ट विभाग व कर्मचाऱ्यांच्या वतीने गरजूंना किराणा वाटप

बीड पोस्टल कर्मचाऱ्यांची साथ, चला देऊ गरजवंतांना मदतीचा हात....

बीड (प्रतिनिधी) दि.11 कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सर्व लाॅक डाऊन असल्या मुळे रोजंदारीचा भयान प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य मजूर गरीब यांच्या उपजीविके साठी कुठेच थारा नाही, त्यामुळे मजुरांए प्रचंड हाल होत आहेत. अशा अडलेल्या नडलेल्या मजूर, गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या लोकांना सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या पालावर व घरी जाऊन त्यांना एक महिन्याचा पुरेल एवढा किराणा सामान देऊन बीड पोस्ट विभाग व कर्मचारी वर्ग सहकार्य करत आहे. बीड शहरातील जुण्या गाव भागातील खडकपुरा पोस्ट ऑफिस येथे गरजवंतांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर प्रकाश आंबेडकर नगर, इमामपूर रोड, बार्शी नाक्या जवळ गोपालांच्या पालावर ही किराना वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी भारतीय पोस्ट सेवेत कार्यरत असलेले बीड डाक अधीक्षक शामसुंदर शास्त्री, डाक निरीक्षक प्रमोद गाडवे, अमरसिंग ढाका, किरण सावंत, विशाल अगवान, महादेव मुंढे, शामसुंदर कावरे, साळुंके, कानिटकर हे उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.