औरंगाबाद । वार्ताहर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हयात एकूण 1207 कामे सुरू असून या कामांवर 8625 मजूर उपस्थित आहेत.कामाच्या ठिकाणी कोवीडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात असून मजूरांना मास्क, सॅनिटायझर देण्यात येत आहे, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली.
यामध्ये ग्रामपंचायतच्या 828 कामावर 6450 मजूर काम करत आहे. तर रेशीम विभागाची 259 कामे सुरू असून 1107 मजूर त्या ठिकाणी काम करत आहेत. वन विभागची 13 कामे चालू असून त्यामध्ये 414 मजूरांना काम मिळाले आहे. तर सामाजिक वनीकरणाच्या 49 कामांवर 329 मजूर आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या 6 कामावर 129 मजूर या प्रमाने यंत्रणानिहाय कामे जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू आहेत. चालू कामांमध्ये सर्वाधिक कामे घरकुल अंतर्गत सुरु असून त्याची संख्या 488 आहे. तर सिंचन विहीरची 276 कामे जिल्ह्यात चालू आहे. रेषिम विभागाची 259 कामे सुरू आहेत.
या कामांमूळे वैजापूर तालुक्यात 2206 मजूरांना काम मिळाले आहे. तर पैठणमध्ये 1312 इतक्या मजूरांच्या हाताला काम मिळाले. सिल्लोडमध्ये 1110 मजूर कामावर असून औरंगाबाद तालुक्यातील कामावरील मजूरांची संख्या 1074 इतकी आहे. फुलंब्री तालुक्यातील मजूर संख्या 995 असून गंगापूरमध्ये 938 मजूर कामावर आहेत. तर कन्नड तालुक्यातील 489 मजूर , खुलताबाद मध्ये 280 आणि सोयगाव तालुक्यातील 221 मजूराचे काम सुरू असून या प्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत औरंगाबाद जिल्हयात एकून 1207 कामे चालू आहेत. जिल्ह्यात नोंदणीकृत मजूरांची एकूण संख्या 1051966 आणि 483963 कुटुंबे आहेत. त्यापैकी 132105 अॅक्टीव्ह लेबर्स ( मागील तीन वर्षात किमान 1 दिवस काम केलेले ) आहेत. प्रशासनाद्वारा त्यांच्याशी संपर्क करून कामाची मागणी आहे किंवा नाही याची पडताळणी केली जात आहे. तसेच मजुरांना मागणी प्रमाणे काम उपलब्ध करून देण्याकरिता 63679 (6236417 मनुष्य दिवस) कामांचा शेल्फ तयार आहे.अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिली.
रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे
कोरोना आजारामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या निर्देशाचे पालन करत शासनाने या कामांना मान्यता दिलेली आहे. राज्यातील सर्व गावात गावनिहाय मंजूर करण्यात आलेल्या कामांचे नियोजन करून त्यानुसार प्रत्यक्ष कामे सुरू करण्याच्या सूचना जिल्हास्तरावर रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागातील जनतेने मनरेगाच्या रोजंदारीचा लाभ घ्यावा,असे आवाहन रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी केले आहे.
Leave a comment