पाचोड । विजय चिडे
दरवर्षी रासायनिक खताच्या वाढणार्या किमती, शेतीची मशागत, बियाणे, औषधी, खुरपणी, वीज बिले, पीक काढणी खर्च वाढत असल्याने शेतजमीन कसणे कठीण झाले आहे. परिसरात शेती मशागतीबरोबरच शेणखत वापरण्यास शेतकरी पसंती दाखवीत आहेत. शेणखत शेतीसाठी सर्वोत्तम असून, शेतीचा पोत शेणखतामुळे सुधारला जाऊन शेणखत किमान दोन वर्षे जमिनीचा पोत टिकवून ठेवत असल्याने शेणखत वापरण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. पूर्वीच्या काळी संपूर्णत: शेणखत वापरले जाई; मात्र काळानुरूप शेती मशागत व उत्पन्नात बदल होत गेला. आजही रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. एकीकडे जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखत दुर्मिळ होत चालले आहे. यापूर्वी शेणखत हे प्रतिबैलगाडीवर विक्री होत असे; मात्र बैलगाड्या कालबाह्य झाल्या. सध्या ट्रॅक्टरचा वापर शेतीसाठी वाढल्याने आजघडीस प्रति ट्रॉलीवर दर ठरविला जात आहे. आज जेवढा शेतीला खर्च लावला तेवढेच उत्पन्न वाढते, असे समीकरणच होऊन बसले आहे. या खर्चावर अंकुश कसा लावता येईल,
याविषयी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे. माझ्याकडे गायी, बैल, बकर्या मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे शेणखत मोठ्या प्रमाणात असते. मी माझ्या शेतीमध्ये त्याचा पुरेपूर उपयोग घेतो. त्यामुळे माझी जमीन सुपीक असून, जमिनीचा पोतही चांगला आहे व उत्पन्नही चांगले निघते व अन्नधान्यही चवदार असते. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर जास्त करीत नाही. शेणखत शेतीसाठी सर्वोत्तम असून, जमीन ओलावा धरून राहते. मी नांगरणी अगोदर पाच ट्रॉली खत प्रति 2500 रुपये ट्रॉलीने विकत घेऊन मजूर लावून पांगविले व नंतर नांगरणी करून कपाशीसाठी सरी काढली आहे.
Leave a comment