हस्तांदोलन व गळाभेट टाळत सोशल डिस्टन्सिंगंचे नियम पाळण्यात आल्याचे दिसले
पाचोड । विजय चिडे
पाचोडसह परिसरात सोमवारी ता.25 रोजी रमजानची ईद अर्थात (ईल उल्ल फिञ) ची नमाच प्रथमच घरोघरी अदा करण्यात आल्याने प्रथमच ईदगा मैदानात सर्वञ शांतता दिसून आले. जगभरातून कोरोनाचा नायनाट व्हावा यासाठी मुस्लिम बांधवांकडून अल्लाच्या चरणी दुआ करण्यात आली. देशभरात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मंदिर मस्जिद अथवा चर्च मध्ये प्रार्थना करण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले आहे.त्यामुळे मुस्लिम बांधवांनी पविञ रमजान महिन्याची महिनाभर ईबादत घरीच राहून अदा केली. महिनाभर घरात रमजानचे रोजे ठेवल्यानंतर सोमवार (ता.25) घरोघरी ईद-उल-फित्र साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सर्वांनी घरातच कुटुंबासोबत ईद-उल-फित्रची नमाज अदा करुन सर्वत्र शांती, कोरोनामुक्तीसाठी दुआ केली. कोरोनामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वांना ईदगाह मैदाने, मशिदीत न जात घरातच नमाज अदा करावी लागली.
पाचोड, आडूळ, विहामांडवा, दावरवाडी, नांदर, थेरगाव, कोळी बोडखा, नृवगाव आदी ठिकाणी मुस्लिम धर्मगुरू आणि मौलवींनी घरीच राहून ईद साजरी करण्याचं आवाहन केलं होते. सोमवारी सर्वञ घरोघरी ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगंच्या नियमाकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येऊन ईदच्या दिवशी हस्तांदोलन किंवा गळाभेट न करता सोशल डिस्टन्सिंगंच पालन करीत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच साध्या पद्धतीनेच ईद साजरी करण्यात आली. यावेळी पाचोड पोलिसांनी कडक बंदोबस्त बजावला होता.
Leave a comment