सुचिता कुलकर्णी यांचा तीन वर्षांपासुन सुरू आहे उपक्रम
औरंगाबाद । वार्ताहर
ब्राह्मण रणरागिणी तर्फे लॉक डाउन च्या काळा मध्ये आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे या बद्दल माहिती देताना सौ सुचिता कुलकर्णी ब्राह्मण रणरागिणी ग्रुप च्या अडमीन सांगतात की आपली संस्कृती मुलांमध्ये लहान पासून रुजने अत्यंत आवश्यक आहे आणि कोरोना मुळे जरी आपल्याला खूप भीती दायक वातावरणात घरात राहावे लागत असेल तरी या संधी चा फायदा हा सर्वांनी घेतला पाहिजे, म्हणून मी व प्रणिता टोणपे यांच्या कल्पनेतून युटयुब या सुप्रसिध्द सोशल मिडीया चा वापर करून ब्राह्मण रणरागिणी या चॅनेलची सुरूवात करण्यात आली. युटयुब या सोशल मिडीयाचा माध्यमातुन आपल्याला आपले कलागुण संपुर्ण जगासमोर व्हिडीओच्या माध्यमातुन दाखवता येतात. अल्पावधीतच आमच्या या चॅनेलला भरपुर प्रतिसाद मिळाला आणि या चॅनेलचे सबस्क्रायबर्सही वाढले. नुसते भारतातूनच नव्हे तर, युके, युएस व जपान या देशातूनही दर्शक या चॅनेलला प्रतिसाद येत आहेत.
चला जपुया आपली संस्कृती हा तीन ते पाच वर्ष वयोगटातील चिमुकल्या साठी श्लोक पठण स्पर्धा ऑनलाइन युट्यूब च्या माध्यमातून घेण्याचे ठरवले ब्राह्मण रणरागिणी हा आमचा व्हाटस अँप ग्रुप तीन वर्षांपासून कार्यरत आहे या ग्रुप मधील सर्व महिलांनी व त्याच्या ओळखीच्या असलेल्या त्यांच्या चिमुकल्या नि खूप सुंदर असा सहभाग नोंदवला , प्रथम फेरी मधून कमलेश सुदामे वय वर्ष पाच व माधवन ताथोडे वय वर्ष चार हे विजेता ठरले खास पालकांच्या आग्रहास्तव परत याच वयोगटा ची स्पर्धा घेण्यात आली त्या मध्ये प्रथम क्र स्वरा कुलकर्णी वय वर्ष तीन ,व द्वितीय चि अवनिश करंदीकर विजेता ठरला सर्व सहभागी चिमुकल्या ना प्रशिस्ती पत्र व्हॉट अँप च्या माध्यमातून वितरण करण्यात आले अश्याच आगळी वेगळी स्पर्धा आम्ही पुढेही घेणार आहोत असे त्यांनी सांगितले. या मध्ये सर्वांनी सहभाग घेतला या पुढेही या संधीचा लाभ सर्व ब्राह्मण महिलांनी घ्यावा असे आवाहन सुचिता कुलकर्णी यांच्या कडून करण्यात आले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रामदासी गुरुजींचे मार्गदर्शन लाभले.
Leave a comment