भराडी । वार्ताहर
येथे दि.22 मे 2020 पासून हॉटेल्स,पान टपरी व सलून या दुकान वगळता इतर सर्व दुकाने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कापड दुकान, जनरल स्टोअर, इलेक्ट्रिक दुकान, इतर साहित्य विकणारे दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. त्याच प्रमाणे येथील रोडलगत भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात मंडी भरत असल्याने त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे भान न ठेवता भाजीपाला घेण्यासाठी गर्दी होत आहे. या भाजीपाल्या वाल्यान जवळ सेनेटायझर ही दिसून येत नाही व यांच्या तोंडावर मास ही वापरत नसल्याने भराडी येथे क्वचित नागरिक मास किंवा रुमालाचा वापर करत आहे परंतु जास्त प्रमाणात घरातून बाहेर निघताना अनेक ग्रामस्थांच्या तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधलेले दिसून येत नाही.
भराडी येथे पान टपरी व हॉटेल्स फक्त नावालाच बंद असल्याचे चित्र दिसून येते परंतु येथे समोसे कचोरी पेढा कोल्ड्रिंक्स पाण्याच्या बाटल्या त्याच प्रमाणे गुटख्याच्या पुड्या बिडी सिगारेट सर्वकाही मिळत असल्याने लॉक डाऊन भराडी मध्ये होते किंवा नाही हे समजलेच नाही सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस सकाळ-दुपार-संध्याकाळ याप्रमाणे गावात मोटरसायकलवर भ्रमण करून निघून जात होते. भराडी सिल्लोड तालुक्याच्या गावात मागील दोन महिन्यापासून एकाही व्यक्तीला किंवा शहरांमधून गावात आलेल्या मजुराला मनाचे लक्षण दिसून आले नाही परंतु सिल्लोड कन्नड बस वाहतूक सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे किंवा गावातील दुकानांमध्ये होणार्या गर्दीमुळे कोरोना महामारी पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही . कारण येथे आता बाहेरगावाहून येणार्यांची संख्या मध्ये वाढ होत आहे त्यामुळे ना गावात कुठेही सेनेटायझर चा शिरकाव त्यांच्यावर करण्यात येत नसल्याने किंवा कोणत्याही प्रकारची दक्षता न घेता या गावात ग्रामस्थांचा बिनधास्त वावर सुरू झालेला आहे. ग्राम संसद कार्यालया मधून लाऊडस्पीकर द्वारे दररोज कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये एका ठिकाणी अनेकांनी गोळा होऊ नये, तोंडाला मास्क बांधणे मास्क उपलब्ध नसल्याने रुमाल बांधूनच घराबाहेर पडणे घरात गेल्यानंतर अगोदर साबणाने किंवा सॅनिटरी जरणे हात धुणे अशा वारंवार सूचना देण्यात येत आहे त्याच प्रमाणे तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल असे धाक दाखवून सुद्धा भराडी येथे असंख्य नागरिक तोंडाला मास्क किंवा रुमालाचा वापर न करता बिनधास्तपणे वावरत आहे. सिल्लोड शहरात तोरणाच्या महामारी ने पाऊल टाकले आहे सिल्लोड पासून भराडी हे गाव फक्त बारा किलोमीटर असल्याने येथे येण्यासाठी या मारीला दक्षता घेतल्या नाही गेली तर ही वेळ लागणार नाही.मराठी येथे गर्दी वाढत चालल्याने महिनाभराच्या आत या गावात करुणा महाभारी ठेवल्याशिवाय राहणार नाही असा अंदाज गावात अनेक ग्रामस्थ लावत आहे.
Leave a comment