औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सुरवातीला ‘ग्रीन झोन’ मध्ये असलेला औरंगाबाद जिल्हा ‘रेड झोन’ मध्ये आला, तरी नागरिक सुधारायला तयार नाहीत, असे चित्र ईद निमित्त शहरात पुन्हा एकदा पाहायला मिळाले. लॉकडाउन तोडत शहरातील विविध भागातून नागरिक बाहेर पडल्याने रोडसह एकूणच बाजारपेठेत नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीने यंत्रणेचीही झोप उडवली.
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1301 वर पोहोचली, तर जिल्हाभरात एकूण 1301 कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातही शहरात पाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या ’रेड झोन’मध्ये गेला आहे. शहरातील तब्बल आठ भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाले आहेत. दरम्यान, शासनाने ग्रीन झोनमधील जिल्ह्यात अटी-शर्तींवर थोडी मुभा दिल्यानंतर रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबादकर घराबाहेर पडू लागले. जिल्हाधिकारी महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन डाउनची घोषणा केलेली असताना नागरिक आज मोठ्या संख्येने बाहेर पडले. शहागंज संजयनगर बायजीपुरा कटकट गेट दिल्ली गेट भागात तसेच शहरातील इतरही ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी पोलिस उतरले खरे पण त्यांनाही ही गर्दी नियंत्रित करताना मोठी कसरत करावी लागली. नागरिक ऐकतच नसल्याचे एका अधिकार्याने सांगितले.
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
संजयनगर, बायजीपुरा भाजीपाला, फळे विक्रेत्यांची गर्दी त्यात नागरिकांची गर्दी यामुळे या भागात . त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचाही पूर्णपणे फज्जा उडाला. बहुतांश नागरिक मोटरसायकली घेऊन घराबाहेर पडलेले होते. त्यामुळे बाजारातील गर्दीत भरच पडली होती. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरु केली. तरीही फरक पडत नसल्याचे पाहायला मिळाले
Leave a comment